शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
2
अमेरिकेचा इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांना इशारा, २५ टक्के अतिरिक्त टॅरिफची घोषणा; भारतावर होणार 'हा' परिणाम
3
कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?
4
कोट्यवधींच्या रॉल्स रॉयसच्या दरात मोठी सवलत? किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता
5
आईच्या पिंडदानाची तयारी सुरू होती, तेवढ्यात फोन खणखणला अन्...; असं काही घडलं की सगळेच झाले हैराण!
6
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
7
तुमच्यावर कोणी करणी केलीय का? घरावर बाहेरची शक्ती कार्य करतेय का? कसे ओळखाल? ४ संकेत मिळतात
8
११ वर्षांनी अद्भूत योगात मकरसंक्रांती २०२६: संक्रमण पुण्य काल कधी? पाहा, महत्त्व-मान्यता
9
इराणच्या खामेनी विरोधात बंड पुकारणं पडणार महागात! 'या' २६ वर्षीय तरुणाला दिली जाणार फाशी?
10
Makar Sankranti 2026: संक्रांतीला विशेषतः स्त्रियांनी 'या' गोष्टींचे करावे दान; होतो दुप्पट लाभ आणि कुटुंबाची प्रगती 
11
टॅरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
12
चांदीची ऐतिहासिक भरारी! २.६८ लाखांचा टप्पा पार; आता ३ लाखांचे लक्ष्य? खरेदीची संधी की नफावसुलीची वेळ?
13
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
14
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
15
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
16
PNB मध्ये जमा करा ₹२,००,०००, मिळेल ₹८१,५६८ चं फिक्स व्याज; जाणून घ्या संपूर्ण स्कीम
17
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
18
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
19
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:40 IST

रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने हा निर्णय जाहीर केला. त्यांचे संशोधन पाण्याची कमतरता, हवामान बदल व औद्योगिक प्रदूषणाशी लढण्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते.

स्टॉकहोम : यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जपानचे प्रा. सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाचे प्रा. रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेचे प्रा. ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे.  या तिघा वैज्ञानिकांनी मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स (एमओएफस) क्रांतिकारी संकल्पनेवर काम करून रसायनशास्त्राला नवे वळण दिले आहे. रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने हा निर्णय जाहीर केला. त्यांचे संशोधन पाण्याची कमतरता, हवामान बदल व औद्योगिक प्रदूषणाशी लढण्यासाठी गेम-चेंजर ठरू शकते.

ओमर याघी (अमेरिका) : त्यांनी १९९५ मध्ये ‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क’ हा शब्द वापरला आणि १९९९ मध्ये मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ तयार केले. त्यांनी वाळवंटातील हवेतून पाणी खेचून साठवण्याचे प्रयोग यशस्वी केले.

सुसुमु कितागावा (जपान) : १९९७ मध्ये त्यांनी पहिले स्थिर मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ तयार केले. त्यात मिथेन, ऑक्सिजनसारखे गॅस सहज भरणे-रिकामे करणे शक्य होत असे. त्यांनी या पदार्थांना ‘सॉफ्ट मटेरियल्स’ची संकल्पना दिली.

रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) : १९८०च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी तांबे आयन व कार्बनिक अणूंना जोडून अशा नवीन आण्विक रचनांची निर्मिती केली. हेच आधुनिक मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क संशोधनाचे बीज ठरले.

‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’?‘मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स’ म्हणजे अशा आण्विक संरचना ज्या घनरूप असूनही त्यांच्या आत सूक्ष्म पोकळ्या असतात. या पोकळ्यांमधून गॅस किंवा इतर रसायने सहज जाऊ शकतात. अणू आणि रेणूंना विटांसारखे वापरून तयार केलेल्या या मॉलिक्युलर आर्किटेक्चरला भविष्यातील टिकाऊ तंत्रज्ञानाचा पाया मानले जात आहे.

उपयोग- वाळवंटातील हवेतून पाणी काढणेहवेतली कार्बन डायऑक्साइड किंवा इतर विषारी वायू शोषून घेणे ग्रीन हायड्रोजन, मीथेन यांसारख्या गॅसचे सुरक्षित साठवणफळे लवकर न पिकता दीर्घकाळ टिकण्यासाठी एथिलीन गॅस रोखणे

English
हिंदी सारांश
Web Title : Nobel Prize in Chemistry Awarded for Metal-Organic Frameworks Research

Web Summary : Kitagawa, Robson, and Yaghi won the Chemistry Nobel for metal-organic frameworks (MOFs). Their work offers solutions for water scarcity, climate change, and pollution by creating structures with microscopic pores for gas absorption and storage.
टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार