तुरूंगात कैद्यांसाठी बोलवण्यात आल्या डान्सर, लीक झाला डान्सरच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:59 IST2021-12-30T13:57:36+5:302021-12-30T13:59:56+5:30
Brazil Jail Viral Video : सोशल मीडियावर हा तुरूंगातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्यांसमोर दोन-तीन डान्सर डान्स करताना दिसत आहेत.

तुरूंगात कैद्यांसाठी बोलवण्यात आल्या डान्सर, लीक झाला डान्सरच्या अश्लील डान्सचा व्हिडीओ
तुरूंगात गंभीर गुन्हे करणारे लोक शिक्षा भोगत असतात. भविष्यात त्यांच्याकडून कोणता गुन्हा घडू नये म्हणून त्यांना तुरूंगात टाकलं जातं. तसेच तुरूंगातून त्याने अनेक सुविधांपासून वंचित ठेवलं जातं. पण काही तुरूंगात असे काही प्रकार घडतात ज्यावर विश्वासच बसत नाही. एका तुरूंगात चक्क डान्सर अश्लील डान्स करून कैद्यांचं मनोरंजन करताना दिसल्या. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. ही घटना ब्राझीलमधील (Brazil) गोयणा तुरूंगातील आहे. हा व्हिडीओ ख्रिसमस पार्टीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियावर हा तुरूंगातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात कैद्यांसमोर दोन-तीन डान्सर डान्स करताना दिसत आहेत. तुरूंगातील हा व्हिडीओ लीक झाला आहे. ही पार्टी ब्राझीलच्या एका तुरूंगात आयोजित करण्यात आली होती. हा व्हिडीओ फोनवर रेकॉर्ड करण्यात आला असून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
व्हायरल व्हिडीओत बघायला मिळतं की, तुरूंगात काही डान्सर अश्लील डान्स करत आहेत. तर कैदी त्यांना चिअर करत आहेत. पण आता प्रश्न निर्माण झाला आहे की, तुरूंगात डान्सरना कसं बोलवण्यात आलंय? हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कैद्यांना दुसऱ्या तुरूंगात शिफ्ट करण्यात आलंय. सोबतच एका कर्मचाऱ्याची बदलीही करण्यात आलीये.
व्हायरल झालेल्या व्हिडीओवर तुरूंग कर्मचाऱ्याने स्पष्टीकरण दिलं की, या डान्सर ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी बोलण्यात आल्या होत्या. अजून हे स्पष्ट झालं नाही की, किती कैद्यांच्या मनोरंजनासाठी डान्सर्सना बोलवण्यात आलं होतं. आता व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चौकशीसाठी एक समिती नेमली गेली आहे. चौकशीनंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.