अबब! प्रिन्स हॅरीच्या नवरीच्या ड्रेसची किती ही किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2018 10:37 IST2018-05-19T10:35:11+5:302018-05-19T10:37:32+5:30

मेगनला तिचा लूक कसा कॅरी करायचा हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे ती लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

Prince Harry fiancee Meghan Markle can wear Ralph Russo designed gown for her wedding ceremony | अबब! प्रिन्स हॅरीच्या नवरीच्या ड्रेसची किती ही किंमत!

अबब! प्रिन्स हॅरीच्या नवरीच्या ड्रेसची किती ही किंमत!

लंडन : लंडनमध्ये सध्या प्रिन्स हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कलच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या लग्नाबाबतच्या इंटरेस्टिंग गोष्टी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. सध्या मेगन मार्कलच्या ड्रेसची सगळीकडे चर्चा होत आहे. मेगनला तिचा लूक कसा कॅरी करायचा हे चांगलंच माहीत आहे. त्यामुळे ती लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

39 वर्षीय अभिनेत्री मेगनने 'Suits' नावाचा एक टीव्ही शो केला होता. या शोमधील तिच्या फॅशन स्टेटमेंटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यामुळे ती लग्नात काय परिधान करणार याची चर्चा तर होणारच. महत्वाची बाब म्हणजे मेगन लग्नात परीधान करणाऱ्या गाऊनची किंमत तुम्हाला धक्का देऊ शकते. 

(Image Credit: superselected.com)

मीडिया रिपोर्टनुसार, मेगन मार्कलचा लग्नासाठीचा गाऊन तयार झाला आहे. मेगनच्या या गाऊनची किंमत 90 लाख 81 हजार रुपये असल्याची माहिती आहे. आता लंडनच्या प्रिन्ससोबत लग्न करणार आहे म्हटल्यावर इतकी तर किंमत असणारच. मेगनचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर राल्फ अॅन्ड रुसो यांनी डिझाईन केलाय. 

प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट त्यांच्या एका कॉमन फ्रेन्डच्या माध्यमातून झाली होती. नंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि हॅरीने तिला शाही परीवाराची सदस्य बनवण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Prince Harry fiancee Meghan Markle can wear Ralph Russo designed gown for her wedding ceremony