शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात जाणार पॅलेस्टाइन दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 17:02 IST

फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत. जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती.

ठळक मुद्देया तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी यावर्षी मे महिन्यात भारताला भेट दिली होती.

नवी दिल्ली- 2018 साली जानेवारी महिन्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारताच्या भेटीवर येणार आहेत या भेटीमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यामधील आर्थिक व इतर संबंध अधिक दृढ होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत.यावर्षी जुलै महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. या तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याबाबत जगभरात आणि विशेषतः भारतीय राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्य़ा.

संयुक्त अरब अमिराती दौरा आणि पॅलेस्टाइन भेट एकत्र करण्याचे नियोजन साऊथ ब्लॉकतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेचे यजमान संयुक्त अरब अमिराती असून 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये ती भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट असेल. संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांचे संबंध दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत आहेत. अबूधाबीचे राजपुत्र शेख झायेद बिन अल नाह्यान यांनीही भारताला दोन वेळा भेट दिली आहे. त्यामध्ये 26 जानेवारी 2016 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या भारतदौऱ्याचाही समावेश आहे.

जेरुसलेमचा मुद्दा आणि पॅलेस्टाइनचे पाकिस्तानातील राजदूतअमेरिकेने आणि विशेषतः डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या वर्षी डिसेंबर महिन्यात नव्या वादाला जन्म दिला आहे. जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीचा दर्जा देऊन मध्यपुर्वेत नव्या अशांततेचे वादळ उठले. मात्र भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिकेच्या बाजूने मतदान केले नाही. या मुद्द्यावर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतील. तर रावळपिंडीत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये पॅलेस्टाइनचे राजदूत वालिद अबू अली कुख्यात दहशतवादी हाफिज सईद यांच्याबरोबर एकाच कार्यक्रमात सहभागी झाले होते. याबाबत भारत पॅलेस्टाइन सरकारकडे रितसर नाराजी व्यक्त करणार असून, पॅलेस्टाइनच्या भारतातील राजदुताकडेही याचा जाब विचारला जाणार आहे.

टॅग्स :Palestineपॅलेस्टाइनIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीInternationalआंतरराष्ट्रीय