शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची गर्भवती वागदत्ता आयसोलेशनमध्ये, ट्विट करत महिलांना दिला असा संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 7:14 PM

यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती. 

ठळक मुद्देकॅरी यांनी ट्विट करून गर्भवती महिलांना दिला मोलाचा सल्ला आपल्याला कोरोना टेस्टची आवश्यकता पडली नसल्याचे कॅरी यांनी म्हटले आहे यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे

लंडन -इंग्लंडचेपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची होणारी पत्नी कॅरी सायमंड्स यांच्यातही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचे समजते. त्यांनी स्वतःच रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्या पूर्वीपासूनच जॉन्सन यांच्यापासून वेगळ्या असून सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गर्भवती आहेत.

यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती. 

पूर्वीपेक्षा ठीक -कॅरी यांनी ट्विट केले आहे, की 'कोरोना व्हायरसची मुख्य लक्षणे आढळून आल्याने मी गेला पूर्ण आठवडा बेडवरच घालवला. मला टेस्टची आवश्यकता पडली नाही. आणि 7 दिवस आराम केल्यानंतर मला पूर्वीपेक्षाची चांगले वाटत आहे आणि बरी होत आहे.' कॅरी यांनी गर्भवती महिलांसाठीही काही माहिती शेअर केली आहे. तयांनी लिहिले आहे, 'COVID-19सोबत प्रेग्नंसी चिंताजनक असते. इतर गर्भवती महिलांनी, कृपाकरून ताज्या सूचना वाचाव्यात आणि त्याचे पालन करावे. ज्या मला आवडल्या आहेत.'

जॉन्सन आजून काही दिवस क्वारंटाईनमध्येच राहणार -जॉन्सन यांनी शुक्रवारी ऑनलाईन माहित देताना म्हटले होते, की ते सध्या क्वारंटाईनमध्येच राहतील कारण त्यांचा ताप अद्याप कमी झालेला नाही. ते पूर्वीपेक्षा चांगले आहेत. मात्र, जोवर पूर्णपणे बरे होत नाही, तोवर ते क्वारंटाईनच राहतील.  ते सध्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमानेच कोरोनाचा सामना करत आहेत. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 41,903 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 4,313 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे शनिवारी एका दिवसात तब्बल 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अमेरिका, इटली आणि स्पेनला सर्वाधिक फटका -कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून अधिक रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत तिथे 13 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 हजार 900 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात 450 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क आणि परिसरात सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. येथील बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये 14 हजार 700 तर स्पेनमध्ये 11 हजार 800 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये 7,560, ब्रिटन 4,313, इराण 3,452, जर्मनी 1,444 लोकांचा मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडAmericaअमेरिकाItalyइटलीprime ministerपंतप्रधान