इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव एका धोकादायक वळणावर पोहोचत असल्याचे दिसत आहे. इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांवर सुरू असलेल्या हिंसक कारवाईमुळे आणि अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपाच्या चिंतेमुळे परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. दरम्यान, इराणने अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना कडक इशारा दिला आहे, यामुळे कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी हवाई तळावरून काही कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्यात आले आहे.
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, जर वॉशिंग्टनने इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी लष्करी हस्तक्षेप केला तर त्या प्रदेशातील अमेरिकन तळांवर प्रत्युत्तर दिले जाईल. सौदी अरेबिया, युएई, तुर्की आणि कतार सारख्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाईल, असेही इराणने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कतारमधील अमेरिकेच्या अल-उदेद हवाई तळावरील काही लष्करी आणि नागरी कर्मचाऱ्यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत माघार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा पूर्ण-प्रमाणात निर्वासन आदेश नाही. गेल्या वर्षी इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापूर्वी दिसलेल्या मोठ्या प्रमाणात सैन्य माघारीची चिन्हे नाहीत.
ट्रम्प यांची इराणला धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध वारंवार धमक्या देत आहेत. जर इराणमध्ये निदर्शकांना फाशी देण्यात आली किंवा हिंसाचार सुरू राहिला तर अमेरिका खूप कडक कारवाई करेल. "जर त्यांनी लोकांना फाशी दिली तर तुम्हाला असे काहीतरी दिसेल ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नसेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी इराणी लोकांना रस्त्यावर राहण्याचे आणि संस्थांवर ताबा घेण्याचे आवाहन केले आहे.
इराणमधील निदर्शनांमध्ये २,६०० लोकांचा मृत्यू
मानवाधिकार संघटनांच्या मते, इराणमध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत अंदाजे २,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षांतील इस्लामिक राजवटीविरुद्धचे हे सर्वात मोठे निदर्शने मानले जातात.
Web Summary : Tensions escalate between Iran and the US. Iran warned of retaliation against American bases if the US intervenes in protests. The US has reportedly evacuated some personnel from its Al-Udeid air base in Qatar following the warning. Trump threatened Iran with severe action if violence continues.
Web Summary : ईरान और अमेरिका के बीच तनाव बढ़ रहा है। ईरान ने अमरीकी हस्तक्षेप पर अमरीकी बेस पर जवाबी कार्रवाई की चेतावनी दी। कथित तौर पर अमेरिका ने चेतावनी के बाद कतर में अपने अल-उदेद एयर बेस से कुछ कर्मियों को निकाला। ट्रंप ने हिंसा जारी रहने पर ईरान को कड़ी कार्रवाई की धमकी दी।