अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील पोर्ट आर्थर येथील 'वलेरो एनर्जी' या प्रचंड मोठ्या तेल रिफायनरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा एक भीषण स्फोट झाला. रिफायनरीतील एका इंडस्ट्रियल हीटरमध्ये हा धमाका झाला असून, त्यानंतर संपूर्ण परिसरात आगीचा भडका उडाला आहे. या घटनेमुळे आकाशात काळपट धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत असून परिसरातील शहरांना मोठा धक्का बसला आहे.
स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ६:३० च्या सुमारास हा स्फोट झाला. हा इतका शक्तिशाली होता की त्याचे हादरे शेजारील ग्रोव्ह्स आणि नेदरलँड या शहरांमध्येही जाणवले. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पोर्ट आर्थरमधील पश्चिम भागातील नागरिकांसाठी 'शेल्टर-इन-प्लेस' (घरातच राहण्याचे) आदेश जारी केले आहेत. नागरिकांना खिडक्या आणि दरवाजे पूर्णपणे बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून विषारी वायूचा त्रास होणार नाही.
इंधन पुरवठ्यावर संकटाची टांगती तलवारही रिफायनरी दररोज सुमारे ३,८०,००० बॅरल तेल प्रक्रिया करण्याची अवाढव्य क्षमता राखते. अमेरिकेच्या 'गल्फ कोस्ट' रिफायनिंग नेटवर्कचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याने, येथील कामकाज ठप्प झाल्यास अमेरिकेतील इंधन पुरवठ्यावर आणि किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जीवितहानीबाबत अपडेटसुदैवाने, प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Web Summary : A major explosion hit a Valero Energy refinery in Port Arthur, Texas, causing a large fire and prompting shelter-in-place orders. No casualties reported yet. The incident raises concerns about potential fuel supply disruptions and price hikes. Emergency crews are battling the blaze.
Web Summary : पोर्ट आर्थर, टेक्सास में वैलेरो एनर्जी रिफाइनरी में एक बड़ा विस्फोट हुआ, जिससे भीषण आग लग गई और आश्रय-इन-प्लेस के आदेश जारी किए गए। अभी तक कोई हताहत नहीं। घटना से ईंधन आपूर्ति में व्यवधान और कीमतों में वृद्धि की आशंका बढ़ गई है। आपातकालीन दल आग से जूझ रहे हैं।