ओळख लपवून पॉर्न साईट पाहणाऱ्या लाखो यूजर्सचा खास(गी) डेटा लीक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:36 AM2019-08-21T11:36:07+5:302019-08-21T11:39:17+5:30

नवी दिल्ली : जगभरात नेटकऱ्यांचा खासगी डेटा लीक होण्याच्या घटना घडत आहेत. यावर अंकुश लावण्यात फेसबूक, गुगलसह अन्य कंपन्यांना ...

Porn site leaks over a million users private data | ओळख लपवून पॉर्न साईट पाहणाऱ्या लाखो यूजर्सचा खास(गी) डेटा लीक!

ओळख लपवून पॉर्न साईट पाहणाऱ्या लाखो यूजर्सचा खास(गी) डेटा लीक!

googlenewsNext

नवी दिल्ली : जगभरात नेटकऱ्यांचा खासगी डेटा लीक होण्याच्या घटना घडत आहेत. यावर अंकुश लावण्यात फेसबूक, गुगलसह अन्य कंपन्यांना अपयश आले असताना आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका मोठ्या पॉर्न साईटचा डेटा लीक झाला आहे.

यामध्ये युझरची सर्व खासगी माहिती देण्यात आली आहे. दी नेक्स्ट वेबनुसार पॉर्न साइट Luscious मध्ये नुकतीच एक मोठी गडबड झाली आहे. ही साईट युजरची ओळख लपवून त्यांना पॉर्न फोटो आणि अॅनिमेशन अपलोड करण्याची सुविधा देते. 


या पॉर्न साईटमधील या कमतरतेचा शोध vpnMentor च्या शोधकर्त्यांनी लावला आहे. हे शोधकर्ते या साईटवर अॅडल्ट माहिती अपलोड करणारे आणि ते पाहणाऱ्यांची खासगी माहिती मिळविण्यात यशस्वी ठरले. यामध्ये युजरचे इमेल्स, लिंग, देश, त्यांची आवड आदी गोष्टी आहेत. एवढेच नाही तर त्यांनी त्या वेबसाईटवर जे काही कमेंट, लाईक, शेअर केले ते ही मिळविले आहे. ही सर्व माहिती एन्क्रीप्टेड नसल्याने हा घोळ झाला आहे. 


या माहितीचा शोध लावणाऱ्या संस्थेने सांगितले की, ही माहिती आमच्या हाती लागल्याने सुरक्षित आहे. पण जर अन्य कोणत्या हॅकरच्या हाती लागलेली असेल तर तो या माहितीचा उपयोग फसवणूक, फिशिंग, डॉक्सिंग सारख्या प्रकारासाठी करू शकतो. तसेच युजरला ब्लॅकमेलही केले जाऊ शकते. काही ईमेल आयडी म्हणजे त्या युजरचे पूर्ण नावच आहे. 


Luscious ला याबाबत माहिती मिळाल्यावर ही कमतरता दूर करण्यात आली आहे. मात्र, वेबसाईट चालविणाऱ्यांनी याबाबत काही माहिती दिलेली नाही. या साईटवर असलेल्या ईमेल पैकी 20 टक्के ईमेल खोटे असल्याचा अंदाज आहे. यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Porn site leaks over a million users private data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.