शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

अमेरिकेत शिकायला जायचेय? 'स्टुडंट स्टेटस' पाळायलाच हवा! कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 2:38 PM

नव्या नियमांनुसार 3 ते 10 वर्षांपर्यंत अमेरिका बंदी

मुंबई : अमेरिकेमध्ये शिकायला आलेल्या जवळपास 1.86 लाख परदेशी विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आहे. परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेत 9 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या नुसार 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासूनच विद्यार्थी आणि त्याच्या सोबत गेलेल्या व्यक्तीस बेकायदेशीर मानण्यात येणार आहे. याच बरोबर आणखीही काही बंधने लादण्यात आली आहेत.  

अमेरिकेमध्ये परदेशातून दरवर्षी लाखो विद्यार्थीशिक्षणासाठी येत असतात. याआधी इमिग्रेशन न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच त्या विद्यार्थ्याला बेकायदेशीर ठरविण्य़ात येत होते. नव्या नियमांनुसार या विद्यार्थ्याने 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यास त्याला बेकायदेशीर ठरविण्यात येणार आहे. बेकायदेशीरच्या व्याख्येमध्ये आता केवळ व्हिसाची मुदत संपून गेल्यानंतर राहणारे एवढेच नसून अन्य कारणेही आता अंतर्भूत करण्यात आली आहेत. जसे की एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणसंस्थेने अभ्यासक्रमासाठी आठवड्याची मुदत दिली असेल आणि तो त्या वेळेत पूर्ण करु शकला नसेल तर तो बेकायदेशीर ठरणार आहे. तसेच बेकायदा नोकरी किंवा मुदतबाह्य राहिल्यासही हा नियम लागू होणार आहे. 

याचबरोबर 'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केल्यानंतर 180 दिवसांनंतर या विद्यार्थ्याने अमेरिका सोडल्यास त्याचे परतीचे मार्ग खुंटणार आहेत. म्हणजेच यानंतर पुढील 3 ते 10 वर्षे त्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी असणार आहे.  माफीनामा दिल्यास काय होईल?'स्टुडंट स्टेटस'चे उल्लंघन केलेल्या विद्यार्थ्याने पाच महिन्यांच्या आत माफी मागितल्यास त्याच्यावरील बंदीच्या दिवसांची मुदत तात्पुरती थांबविण्यात येईल. त्याच्या अर्जावर विचार करून गुन्ह्यानुसार अर्ज फेटाळल्यास पुन्हा बंदीचा कालावधी सुरु होणार आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाEducationशिक्षणMigrationस्थलांतरणStudentविद्यार्थी