अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 08:23 IST2025-09-17T08:22:01+5:302025-09-17T08:23:24+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

PM Narendra Modi thanks 'friend' Donald Trump for birthday greetings, vows to strengthen India-US ties | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे 'मित्र' म्हणून कौतुक केले आणि रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर याबाबत माहिती दिली. 

ट्रम्प यांनी यांनी लिहिले की, "माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर खूप चांगली चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगले काम करत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा आभारी आहे." 

पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांना प्रत्युत्तर पंतप्रधान मोदींनीही ट्रम्प यांच्या या शुभेच्छांबद्दल आभार मानले. मोदी म्हणाले की, "माझ्या मित्रा, अध्यक्ष ट्रम्प, माझ्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मला फोन केल्याबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मी देखील भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे."

दरम्यान, दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि करांबाबत काही तणाव निर्माण झाला होता. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती, ज्यात रशियाकडून तेल खरेदीवर २५ टक्के कर समाविष्ट आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती, ज्यात रशियाकडून तेल खरेदीवर २५ टक्के कर समाविष्ट आहे. या तणावानंतर झालेला हा संवाद दोन्ही देशांमधील संबंध पूर्ववत होण्याचे संकेत देत आहे. याआधी, जूनमध्ये झालेल्या जी७ शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प आणि मोदी यांची शेवटची भेट झाली होती.

Web Title: PM Narendra Modi thanks 'friend' Donald Trump for birthday greetings, vows to strengthen India-US ties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.