शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 23:46 IST

PM Modi Trinidad And Tobago Visit : "बलशाली देशांकडे शूर सैन्यासह या 6 गोष्टी असायला हव्यात"

PM Narendra Modi Honoured With Order Of Republic Of Trinidad And Tobago : त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारने पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' प्रदान करून सन्मानित केले आहे. यासाठी पंतप्रधान मोदींनी तेथील सरकारचे आणि जनतेचे आभार मानले. तसेच, १४० कोटी भारतीयांच्या वतीने हा सन्मान मी सामायिक गौरव म्हणून स्वीकारत आहे, असेही मोदी म्हणाले.

'बलशाली देशांकडे शूर सैन्यासह या 6 गोष्टी असायला हव्यात' -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजही भारतीय समुदायाने आपली सामायिक परंपरा, संस्कृती आणि चालीरीती जपल्या आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सौहार्द पावला-पावलांवर दिसून येते. राष्ट्रपती कंगालू जी यांचे पूर्वज संत तिरुवल्लुवर जी यांची भूमी असलेल्या तामिळनाडूचेच होते. ते म्हणाले होते, बलशाली देशांकडे ६ गोष्टी असायला हव्यात, त्या म्हणजे, शूर सैन्य, देशभक्त नागरिक, संसाधने, चांगले लोकप्रतिनिधी, मजबूत संरक्षण आणि नेहमीच सोबत उभे राहतील, असे मित्र देश."

"आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांचही आणि 'तडका'ही" -यावेळी दोन्ही देशांच्या संबंधांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारतासाठी एक असा मित्र देश आहे, जसे की, आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांचही आहे आणि त्रिनिदाद मिरचीचा 'तडका'ही. भारतासाठीत्रिनिदाद आणि टोबॅगो हे केवळ कॅरि-कॉमच नव्हे, तर जगातील एक महत्त्वाचे भागीदारही आहेत. आमचे सहकार्य संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी महत्वाचे आहे." 

यावेळी, "पहिल्यांदाच एखाद्या परदेशी नेत्याला हा सन्मान प्रदान करणे, आपल्या विशेष संबंधांची खोली दर्शवते," असेही मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान