किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 12:52 PM2019-04-12T12:52:28+5:302019-04-12T13:25:53+5:30

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवीन राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.

pm narendra modi the most popular politician on facebook in the world | किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते

किंग ऑफ फेसबुक पंतप्रधान नरेंद्र मोदी, जगात बनले 'नंबर वन' नेते

googlenewsNext

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता मिळवली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनविण्यात सोशल मिडीयाचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदींवर विश्वास टाकत लोकांनी प्रचंड बहुमतात मोदी सरकार निवडून दिलं.  सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहेच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिरपेचात आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. 2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.


वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या नंबरवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला 2.30 कोटी लाईक्स आहेत. हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ घालवत असल्याचं सांगण्यात आलंय. 

या अहवालानुसार तिसऱ्या नंबरवर क्वीन रानिया यांचा नंबर लागतो. जॉर्डनचे सुलतान अब्दुल्लाह यांच्या पत्नी असलेल्या रानिया यांना 1.69 कोटी लाईक्स आहेत. रानिया यांचे फेसबुकसोबत ट्विटर, इंन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरदेखील अकाऊंट आहेत. एक मार्चपर्यंत फेसबुकने केलेल्या अहवालानुसार फेसबुकच्या या सर्व पेजेसला मिळून 34.50 कोटी लाईक्स आहेत. तर पेजवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर 76.7 कोटी लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आहेत.  

कसा तयार केला जातो अहवाल?
फेसबुकच्या काउंडटैंगल टूलच्या मदतीने 962 फेसबुक पेजचे एक्टिविटीचं विश्लेषण करण्यात येते. ज्या पेजचा सर्व्हे केला जातो त्यामध्ये देशातील प्रमुख व्यक्ती किंवा त्यांचे सरकार यांचा समावेश असतो. 

फेसबुकवर लाईक्स कशा वाढविल्या जातात?  
फेसबुकवर लाईक्स वाढविण्यासाठी जाहीरात टूल्सच्या माध्यमातून पेज प्रमोट केले जाऊ शकते. अनेक राजकीय नेते, राजकीय पक्ष फेसबुक पेजला प्रमोट करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मिडीयाच्या माध्यमातून राहण्यासाठी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात. 

Web Title: pm narendra modi the most popular politician on facebook in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.