शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:18 IST

G20 Summit in Brazil : बैठकीत दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक आणि पब्लिक टू पब्लिक रिलेशन मजबूत करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली.

 G20 Summit in Brazil : रिओ दि जानेरो : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील जी-२० शिखर परिषदेदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात सोमवारी (स्थानिक वेळेनुसार)  द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सांस्कृतिक आणि पब्लिक टू पब्लिक रिलेशन मजबूत करण्यासह व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली.

या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील केली. या पोस्टमध्ये, बैठकीचे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "रिओ डी जनेरियो जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटून आनंद झाला. यावेळी आमची चर्चा संरक्षण, सुरक्षा, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात होती. तसेच, आम्ही संस्कृती, शिक्षण आणि इतर अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली".

नॉर्वे आणि पोर्तुगालच्या नेत्यांची बैठकयाचबरोबर, रिओ डी जनेरियोमध्ये जी-२० शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत सुद्धा द्विपक्षीय बैठक झाली. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमध्ये जी-२० शिखर परिषदेवेळी इंडोनेशिया आणि पोर्तुगालच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांसोबत वाणिज्य आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात संबंध मजबूत करण्यावर भर दिला.

परराष्ट्र मंत्रालयाने दिली 'ही' माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो यांना भारत-इंडोनेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचे आश्वासन दिले, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, "भारत-इंडोनेशिया: मैत्रीपूर्ण संबंधांची ७५ वर्षे साजरी करत आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० ब्राझील शिखर परिषदेच्या निमित्ताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांटो यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्राबोवो यांचे अभिनंदन केले आणि भारत-इंडोनेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले".

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीG20 Summitजी-२० शिखर परिषदBrazilब्राझीलInternationalआंतरराष्ट्रीयItalyइटली