PM नरेंद्र मोदी टफ नेगोशिएटर! व्यापारापासून दहशतवादापर्यंत..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 06:17 IST2025-02-14T06:11:17+5:302025-02-14T06:17:50+5:30

PM Narendra Modi US Visit: क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले.

PM Narendra Modi is a tough negotiator! From trade to terrorism.. Donald Trump's announcements | PM नरेंद्र मोदी टफ नेगोशिएटर! व्यापारापासून दहशतवादापर्यंत..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा

PM नरेंद्र मोदी टफ नेगोशिएटर! व्यापारापासून दहशतवादापर्यंत..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणा

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद झाली. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपापसातील बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पुढील ५ वर्षात म्हणजे २०३० पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार दुप्पट करू असं पंतपधान नरेंद्र मोदी म्हणाले तर माझ्यापेक्षा पंतप्रधान मोदी चांगले नेगोशिएटर असल्याचं ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले. 

संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आम्ही एकमेकांना सहकार्य करू. सीमेपलीकडील दहशतवादाविरोधात कठोर कारवाई गरजेची आहे. २६/११ चा दहशतवादी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिल्याबद्दल मी ट्रम्प यांचा आभारी आहे. आमचे न्यायालये त्याला शिक्षा देतील. भारत आणि अमेरिका सोबत राहणे, एकमेकांना सहकार्य करणे हे चांगल्या विश्वाला सुरक्षित करू शकतो असं त्यांनी म्हटलं.

भारताची वाटचाल विकासाकडे...

राष्ट्रपती ट्रम्प यांनी Make America, Great Again चा नारा दिला, म्हणजे MAGA, भारतही वारसा आणि विकास प्रगतीपथावरील विकसित भारत २०४७ चा दृढ निश्चिय घेऊन वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेच्या भाषेत सांगायचं झालं तर विकसित भारताचा अर्थ Make India, Great Again म्हणजे MIGA, जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र मिळून काम करतो म्हणजे MAGA आणि MIGA बनते, Mega Partnership for Prosperity आणि हेच मेगा स्पिरिट आमच्या लक्ष्यांना नवी ऊर्जा आणि संधी देते असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यातील मोदींकडून झालेल्या स्वागताची आठवण केली. दोन्ही देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची घोषणा करण्यात आली. यावर्षी अब्जावधी डॉलरसह अधिक संरक्षण विक्री सुरू झाली आहे. क्वाड आणि इंडो पॅसिफिक मजबूत केले जाईल. तहव्वूर राणाला भारताला सोपवले जाईल यासारखे अनेक निर्णय मोदी आणि ट्रम्प यांच्या बैठकीत घेण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच भारतात टॅरिफ कपातीची घोषणा केली आहे. भारतासोबतचा अमेरिकन व्यवसाय १०० बिलियन डॉलरच्या तोट्यात आहे. दीर्घ काळापासून सुरू असलेली असमानता दूर करण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चा केली असं ट्रम्प म्हणाले. 
 

Web Title: PM Narendra Modi is a tough negotiator! From trade to terrorism.. Donald Trump's announcements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.