न्यूयॉर्क / वॉशिंग्टन : भारताकडून केल्या जाणाऱ्या रशियन तेलाच्या खरेदीवर ‘मी खुश नाही’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठाऊक होते. अमेरिका भारतावर तत्काळ टॅरिफ वाढवू शकते, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
फ्लोरिडाहून वाॅशिंग्टनला एअर फोर्स वन या विमानातून जात असताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भारत मला खूश करू पाहत होता. मोदी खूप चांगली व्यक्ती आहे. मी नाराज असल्याचे त्यांना माहीत होते. भारत व्यापार करतो. अमेरिकेने वाढीव टॅरिफ लागू केले तर ते भारतासाठी वाईट असेल याची त्यांना कल्पना आहे.
भारतावरील टॅरिफमध्ये अमेरिकेने वाढ केल्यानेच आता रशियाकडून तेल खरेदी करण्याचे भारताचे प्रमाण खूप कमी झाले आहे, अशी माहिती अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिली. तेही ट्रम्प यांच्यासोबत एअर फोर्स वन या विमानात होते. ते म्हणाले की, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्के शुल्क लावण्याची टॅरिफ विधेयकामध्ये तरतूद आहे. रशिया-युक्रेन संघर्ष संपविण्यासाठी रशियाच्या तेल व अन्य वस्तूंच्या ग्राहकांवर दबाव टाकणे आवश्यक असल्याचे ग्रॅहम म्हणाले.
‘राष्ट्राध्यक्षांना शुल्क कमी करण्यास सांगाल का?’
अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सांगितले की, सुमारे महिनाभरापूर्वी अमेरिकेतील भारतीय राजदूतांच्या निवासस्थानी गेलो होतो. आम्ही रशियाकडून तेलाच्या खरेदीचे प्रमाण कमी केले आहे, असे ते सातत्याने सांगत होते. तुम्ही राष्ट्राध्यक्षांना शुल्क कमी करण्यास सांगाल का, असे भारतीय राजदूतांनी मला विचारले, असा दावा सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी केला.
कौतुकांच्या पोस्टचा नाही झाला फायदा : काँग्रेस
नमस्ते ट्रम्प आदी कार्यक्रमात ट्रम्प यांना दिलेले आलिंगन, त्यांचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट यांचा काहीही फायदा झालेला नाही, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, तर टॅरिफमध्ये मोठी वाढ करण्याची धमकी त्यांनी पुन्हा दिली आहे, अशी टीका काँग्रेसने केंद्रातील भाजप प्रणित सरकारवर सोमवारी केली.
Web Summary : Trump claimed Modi knew he was unhappy with India's Russian oil purchases. He threatened tariffs, adding India reduced purchases after US pressure. Senator Graham mentioned potential 500% tariffs on Russian oil buyers. Congress criticized Modi's outreach to Trump, saying it yielded no benefits.
Web Summary : ट्रम्प ने दावा किया कि मोदी को पता था कि वह भारत की रूसी तेल खरीद से नाखुश हैं। उन्होंने टैरिफ की धमकी दी, और कहा कि अमेरिका के दबाव के बाद भारत ने खरीद कम कर दी। सीनेटर ग्राहम ने रूसी तेल खरीदारों पर 500% टैरिफ की संभावना का उल्लेख किया। कांग्रेस ने मोदी के ट्रम्प तक पहुँचने की आलोचना की, कहा कि इससे कोई फायदा नहीं हुआ।