"निष्पाप, निरपराध लोकांची हत्या खपवून घेणार नाही"; इस्रायली संसदेत पंतप्रधान मोदींचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 22:37 IST2026-02-25T22:36:39+5:302026-02-25T22:37:40+5:30
PM Modi Israel Parliament Speech: संपूर्ण जगाने दहशतवादाचा एकजुटीने सामना व विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले

"निष्पाप, निरपराध लोकांची हत्या खपवून घेणार नाही"; इस्रायली संसदेत पंतप्रधान मोदींचे विधान
PM Modi Israel Parliament Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ वर्षांत दुसऱ्यांदा इस्रायलमध्ये दाखल झाले. विमानतळावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी यांनी मोदींचे स्वागत केले. त्यांना विशेष गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेला संबोधित केले. यावेळी हमासचे नाव घेत पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला आणि संपूर्ण जगाने दहशतवादाचा एकजुटीने सामना व विरोध करायला हवा, असा पुनरुच्चार केला.
#WATCH | Jerusalem, Israel: Israel Parliament confers "Speaker of the Knesset Medal" upon Prime Minister Narendra Modi
— ANI (@ANI) February 25, 2026
This is the highest honour of the Knesset. The medal is being conferred in recognition of PM’s exceptional contribution – through his personal leadership – to… pic.twitter.com/RAR1AO6n1j
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा
निष्पाप नागरिकांची हत्या अस्वीकारार्ह
इस्रायलच्या संसदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारतीय जनतेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारा पहिला भारतीय पंतप्रधान असणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पुन्हा एकदा येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. ७ ऑक्टोबरला घडलेल्या हत्याकांडाचे आम्हाला दुःख आहे. निष्पाप नागरिकांची हत्या अस्वीकारार्ह आहे, अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलता धोरण असले पाहिजे. जगाने त्याविरुद्ध एकजुटीने भूमिका घेतली पाहिजे. कुणीही दुहेरी निकष लावणे योग्य नाही."
शांतता, स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी भारत जगासोबत उभा
"७ ऑक्टोबरला झालेल्या भयानक हमास दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवितहानीबद्दल मी शोक व्यक्त करतो. ज्या कुटुंबाचे जग उद्ध्वस्त झाले, त्या प्रत्येक कुटुंबाप्रती आमच्या संवेदना आहेत. आम्हाला तुमचे दुःख समजते. आम्ही तुमचे दुःख समजू शकतो. भारत पूर्ण विश्वासाने इस्रायलसोबत खंबीरपणे उभा आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेला गाझा शांतता उपक्रम यातून पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो. भारताने त्याला पाठिंबा दर्शवला आहे. शांततेचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. परंतु शांतता आणि स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी भारत जगासोबत उभा आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.