फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 19:04 IST2025-02-12T19:03:57+5:302025-02-12T19:04:32+5:30

PM Modi France Visit: पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी अंतराळ क्षेत्रातील सहकार्याचाही आढावा घेतला.

PM Modi France Visit: France to purchase Pinaka rocket launcher from India, agreement signed during Modi-Macron meeting | फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार

फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार, मोदी-मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार


PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आज (12 फेब्रुवारी 2025) द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान, मध्यपूर्व, युरोप, परस्पर राजकीय भागीदारी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचे आवाहनही दोन्ही नेत्यांनी केले. 

जागतिक आणि प्रादेशिक समस्यांवर चर्चा
बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी जागतिक AI क्षेत्र सार्वजनिक हितासाठी फायदेशीर सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम प्रदान करेल, याची खात्री करण्यासाठी ठोस कृती करण्याची वचनबद्धता देखील अधोरेखित केली. याशिवाय, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये सुधारणा करण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला आणि विविध जागतिक मुद्द्यांवर जवळून समन्वय साधण्याचे मान्य केले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी फ्रान्सच्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला. 

फ्रान्स पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करणार 
पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश या धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. तसेच, फ्रेंच स्टार्ट-अप इनक्यूबेटर स्टेशन एफ येथे 10 भारतीय स्टार्टअप्सचे आयोजन करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. फ्रान्स भारताकडून पिनाक रॉकेट लॉन्चर खरेदी करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही नेत्यांनी न्याय्य, शांततापूर्ण आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी सुधारित बहुपक्षीयतेचा पुरस्कार केला. 

Web Title: PM Modi France Visit: France to purchase Pinaka rocket launcher from India, agreement signed during Modi-Macron meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.