PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:28 IST2025-12-11T20:28:09+5:302025-12-11T20:28:38+5:30

PM Modi Donald Trump conversation: पंतप्रधान मोदी यांनी स्वत: ट्विट करून दिली माहिती

pm modi doland trump conversation on bilateral relations India US work together for global peace stability and prosperity | PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार

PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार

PM Modi Donald Trump conversation: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अजब निर्णय घेण्यामुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपासून त्यांनी भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्याचे प्रयत्न केले. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु झालेला लष्करी तणाव कमी करण्याचे श्रेयही अनेकदा स्वत: घेतले. याशिवाय रशियाकडून भारताने तेलखरेदी करणे थांबवावे, असाही आग्रह त्यांनी धरला होता. पण या सर्व निर्णयांवर भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. तसेच, काही वेळेस मुत्सद्दीपणाने गोष्टी हाताळण्यात आल्या. गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारतात येऊन गेले. त्यानंतर ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष लागले होते. पण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सुसंवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधल्याची माहिती खुद्द मोदींनीच आपल्या एक्स हँडलवरून दिली. या संवादात काय चर्चा झाली याबद्दलही त्यांनी थोडक्यात माहिती दिली. "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत माझी अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली. आम्ही आमच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धी कायम राखण्यासाठी सतत एकत्र काम करत राहतील," असे मोदी यांनी ट्विटरवरून सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला 'डेड इकोनॉमी'  असे संबोधून भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती. मात्र, ट्रम्प यांच्या या वक्तव्याला अमेरिकेतील टेक कंपन्यांनी त्यांच्या विक्रमी गुंतवणुकीतून मोठे आव्हान दिले. मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, गुगल आणि ओपनएआयसह अनेक दिग्गज कंपन्यांनी भारतात कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करत भारतीय बाजारावर आणि भविष्यावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला. अमेरिकन टेक कंपन्यांची ही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक स्पष्टपणे दर्शवते की, भारताची अर्थव्यवस्था डेड इकोनॉमी नसून, ती अत्यंत वेगाने वाढणारी, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि भविष्यातील जागतिक तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याची क्षमता असलेली अर्थव्यवस्था आहे.

Web Title : पीएम मोदी, डोनाल्ड ट्रम्प ने वैश्विक शांति, स्थिरता पर चर्चा की।

Web Summary : पीएम मोदी और डोनाल्ड ट्रम्प ने द्विपक्षीय संबंधों, क्षेत्रीय और अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर चर्चा की। उनका लक्ष्य वैश्विक शांति, स्थिरता और समृद्धि के लिए सहयोग करना है। पहले के व्यापार तनाव और आलोचना के बावजूद, अमेरिकी टेक कंपनियां भारत में भारी निवेश कर रही हैं, जो इसकी आर्थिक ताकत की पुष्टि करता है।

Web Title : PM Modi, Donald Trump discuss global peace, stability, and prosperity.

Web Summary : PM Modi and Donald Trump discussed bilateral relations, regional & international issues. They aim to collaborate for global peace, stability, and prosperity. Despite earlier trade tensions and criticism, US tech firms are investing heavily in India, affirming its economic strength.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.