शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर आढळला प्लास्टिक कचरा, प्रदूषण बघून संशोधकांनाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:50 IST

पाणबुडी ४३ मिनिटे समुद्राच्या तळाशी राहिली आणि ६५० मीटर अंतर कापले.

अथेन्स : ग्रीसमधील कॅलिप्सो डीपच्या तळाशी १६,७०० फूट खोलीवर, शास्त्रज्ञांना धक्कादायक सत्य पाहायला मिळाले. येथे आढळणाऱ्या कचऱ्यात ८८% प्लास्टिक होते. महासागरातील सर्वांत खोल खंदकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी पोहोचण्यासाठी बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकांनी लिमिटिंग फॅक्टर नावाच्या हाय-टेक पाणबुडीचा वापर करून कॅलिप्सो डीपच्या तळाचा शोध घेतला.

पाणबुडी ४३ मिनिटे समुद्राच्या तळाशी राहिली आणि ६५० मीटर अंतर कापले. यावेळी, जहाजांमधून टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि कचरा विखुरलेला होता. येथील समुद्राचा एक इंच भागही प्रदूषणमुक्त राहिलेला नाही, याच प्रकारे इतरही समुद्र प्रदूषित होत राहिले तर ते सजीवसृष्टीसाठी अत्यंत धोकादायक असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

अहवाल काय सांगतो? -८८% कचरा प्लास्टिकचा आहे आणि तो कोणत्या ना कोणत्या किनाऱ्यावरून वाहून येथे पोहोचतो. 

प्लास्टिक पिशव्यांसारखा कचरा तळाशी साचतो. सूक्ष्म कणांत रूपांतरित होतो. जहाजांनी कचरा टाकल्याचे पुरावे आहेत.

हा धोक्याचा इशारा का आहे?प्लास्टिक प्रदूषणामुळे दुर्मीळ सागरी प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.सागरी परिसंस्थांना गंभीरपणे हानी पोहोचवू शकते.सूक्ष्म प्लास्टिक कण अन्नसाखळीत प्रवेश करतात आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण करतात.

कॅलिप्सो डीप म्हणजे काय?भूमध्य समुद्रातील सर्वांत खोल खंदक, ग्रीसच्या पेलोपोनीज किनाऱ्यापासून ६० किलोमीटर पश्चिमेस स्थित आहे.येथील खोली ५,२६७ मीटर आहे. ज्यामुळे तो युरोपमधील सर्वांत खोल बिंदू बनतो. हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे.

काय आहे उपाय?समुद्रात कचरा कोणत्याही स्वरुपातील फेकण्यावर कडक निर्बंध असले पाहिजेत.प्लास्टिकचा वापर दैनंदिन जीवनात कमीत  कमी केला पाहिजे.सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत समाजात व्यापक स्तरावर  जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Waterपाणीpollutionप्रदूषण