Will You Marry Me? प्रपोजल घेऊन उडणाऱ्या विमानाला भीषण अपघात; प्रवाशाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:51 IST2021-10-05T18:49:43+5:302021-10-05T18:51:23+5:30
विमानाला भीषण अपघात; वैमानिक गंभीर जखमी, प्रवाशाचा मृत्यू

Will You Marry Me? प्रपोजल घेऊन उडणाऱ्या विमानाला भीषण अपघात; प्रवाशाचा मृत्यू
कॅनडामध्ये एका विमानाला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. हे विमान लग्नाची मागणी घालणारं बॅनर घेऊन उडत होतं. त्याच दरम्यान विमानाला अपघात झाला. मॉन्ट्रेल शहरात ही दुर्घटना घडली.
कॅनडाच्या परिवहन सुरक्षा बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार, सेस्सना-१७२ विमानाला अपघात झाला. तू माझ्या लग्न करशील का?, असं प्रपोजल असलेलं बॅनर घेऊन हे विमान उड्डाण करत होतं. विमान हवेत असताना त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळलं आणि त्यानं पेट घेतला.
या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर वैमानिक जखमी झाला. जियान पिएरो सियाम्बेला असं त्यांचं नाव आहे. ते एका जाहिरात एजन्सीचे मालक आहेत. दुर्घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यासाठी दोघांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. या विमानात केवळ दोनच जण होते. यातील एकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर विमान जमिनीवर कोसळताच त्यानं पेट घेतला. परिसरात गोंधळ निर्माण झाला. काही वेळात अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत विमान जळून राख झालं होतं.