विमान, लष्करी हेलिकाॅप्टरची हवेत टक्कर; सर्व प्रवाशांचा मृत्यू, आतापर्यंत २८ मृतदेह हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:05 IST2025-01-31T06:04:49+5:302025-01-31T06:05:12+5:30
अमेरिकेतील भीषण घटना.

विमान, लष्करी हेलिकाॅप्टरची हवेत टक्कर; सर्व प्रवाशांचा मृत्यू, आतापर्यंत २८ मृतदेह हाती
अर्लिंग्टन : अमेरिकन एअरलाइन्सचे जेट विमान रेगन विमानतळावर उतरत असताना त्याची लष्करी हेलिकॉप्टरशी बुधवारी रात्री धडक झाली. या विमानात ६० प्रवासी, चार कर्मचारी असे ६४ लोक व हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. ते सर्व जण मरण पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोटोमॅक नदीकिनारी तसेच नदीपात्रात घेतलेल्या शोधानंतर २८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
या भीषण दुर्घटनेनंतर रेगन विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातग्रस्त विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष पोटोमॅक नदीच्या तळाशी आढळून आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी रात्री जेट विमान व लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला. एकाच रनवेवर जेट विमान, हेलिकाॅप्टर उतरत होते. कोसळलेले हेलिकॉप्टर व विमानाचा नदीपात्रातही शोध जारी १३ जानेवारी १९८२ रोजी खराब हवामानामुळे एअर फ्लोरिडाचे विमान पोटोमॅक नदीत कोसळले. त्यात ७८ लोक ठार झाले होते. २००९ मध्ये न्यूयॉर्कमधील बफेलो शहराजवळ विमान अपघातात ४६ प्रवासी आणि ४ कर्मचारी मरण पावले होते.