विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 19:46 IST2025-08-25T19:43:35+5:302025-08-25T19:46:58+5:30

२ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलियातील टास्मानिया येथून उड्डाण घेतलेल्या विमानाचा अद्याप शोध लागलेला नाही. खूप प्रयत्न करूनही, कोणतीही माहिती मिळालेली नाही.

plane disappeared in mid-air It took off from Tasmania 22 days ago what exactly happened? | विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?

विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?

मलेशियने फ्लाईट MH370 हे विमान ८ मार्च २०१४ रोजी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे हे फ्लाईट अचानक बेपत्ता झाले होते. विमानात २३९ लोक होते. या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली. अपघाताचे कारण अजूनही गूढच आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियात  २ ऑगस्ट २०२५ पासून दोन लोक आणि त्यांच्या कुत्र्याला घेऊन जाणारे एक प्रवासी विमान बेपत्ता आहे. २२ दिवसांनंतरही विमानाचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

मिळालेल्या माहितीनुसार, ७२ वर्षीय ग्रेगरी वॉन, त्यांचा ६६ वर्षीय जोडीदार किम वॉर्नर आणि त्यांचा कुत्रा मॉली हे विमानात होते. ग्रेगरी विमान चालवत होते. २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता टास्मानियातील जॉर्जटाउन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. विमान आधी व्हिक्टोरियाला नेण्यात आले आणि नंतर ते न्यू साउथ वेल्समधील हिल्स्टन विमानतळावर रवाना झाले. पण बास स्ट्रेटवरून विमान अचानक गायब झाले.

संध्याकाळपर्यंत विमानाकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने कुटुंबाने धोक्याची घंटा वाजवली. त्यानंतर शोध सुरू करण्यात आला. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी उत्तर तस्मानिया, बास स्ट्रेट आणि व्हिक्टोरियामध्ये अनेक हेलिकॉप्टर, बोटी आणि जहाजांच्या मदतीने शोध सुरू केला. तथापि, २२ दिवसांनंतरही अधिकाऱ्यांना कोणतेही यश मिळालेले नाही. त्यांना कोणताही अवशेष सापडला नाही किंवा अपघाताचे कोणतेही चिन्ह सापडले नाही. त्याच वेळी, विमानातून कोणतेही आपत्कालीन सिग्नल पाठवले गेले नाहीत, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तपास अजूनही सुरू आहे

तस्मानिया पोलिस निरीक्षक निक क्लार्क यांनी म्हटले आहे की, वॉन हा एक अनुभवी ऑपरेटर होता. अशा परिस्थितीत, कोणताही आपत्कालीन कॉल किंवा आपत्कालीन सिग्नल देण्यात आला नसल्याने, त्याच्या बेपत्ता होण्याचे कारण पोलिसांना समजू शकलेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: plane disappeared in mid-air It took off from Tasmania 22 days ago what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.