अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 21:56 IST2025-06-09T21:55:52+5:302025-06-09T21:56:04+5:30

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटअवेअर डॉट कॉमनुसार, विमान फिनिक्स शहराकडे जात होते.

Plane crashes into US ocean; search for six people underway | अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अमेरिकेजवळील समुद्रात एक छोटेखानी विमान कोसळले आहे. या अपघातात सहा जण बेपत्ता झाले असून तटरक्षक दल मलब्याच्या शोध घेत आहे. 

अमेरिकेतील सॅन दिएगो येथे हा विमान अपघात झाला आहे. एपी वृत्तसंस्थेनुसार हे विमान पॅसिफिक महासागरात कोसळले. रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. पॉइंट लोमाजवळील समुद्रात विमानाचे अवशेष दिसल्याचे अमेरिकन तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे. 

या विमानातून प्रवास करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर, सुमारे २०० फूट खोल समुद्रात हे विमान कोसळले आहे. मानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. हे दोन इंजिन असलेले सेस्ना ४१४ विमान होते. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटअवेअर डॉट कॉमनुसार, विमान फिनिक्स शहराकडे जात होते.
 

Web Title: Plane crashes into US ocean; search for six people underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.