अमेरिकेतील कॅलिफोर्नियात विमान घरावर कोसळलं, 2 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 09:02 IST2021-10-12T08:59:27+5:302021-10-12T09:02:35+5:30
घरावर विमान कोसळताच आगीचा मोठा भडका उडाला.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात विमान घरावर कोसळलं, 2 जणांचा मृत्यू
कॅलिफोर्निया: अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात सोमवारी एक मोठा विमान अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक विमान कॅलिफोर्नियातील घरांवर कोसळलं आहे. या अपघातात एका शाळेच्या इमारतीलाही नुकसान झालं आहे.
कॅलिफोर्निया राज्यात एक जुनं विमान रहिवासी भागात कोसळलं. हे विमान कोसळताच घराला आग लागली. हा अपघात लॉस एंजेलिसच्या सँटी शेजारील सँटाना हायस्कूलजवळ झाला. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल आग विझवण्यासाठी पोहोचले.
Plane crash in #Santee, #California.pic.twitter.com/btP9TgyFVP
— G219_Lost (@in20im) October 11, 2021
रिपोर्ट्सनुसार, दोन इंजिनचे सेस्ना 340 विमानाने अॅरिझोना येथून उड्डाण घेतली होती. उड्डाण घेतल्यानंतर हे विमान लॉस एंजेलिस भागातील रहिवासी भागात कोसळलं. घरावर कोसळण्यासोबतच विमानाने एका ट्रकलाही धडक दिली.