शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आत्महत्त्या करायला निघालेल्या फेल्प्सने जिंकली ऑलिंपिकमध्ये २३ सुवर्ण पदके

By admin | Published: August 21, 2016 9:07 AM

परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.

- पवन देशपांडे / ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २१ : आत्महत्त्याच करू का? एरवी जगून तरी काय करू हेच कळत नाहीए़ त्यापेक्षा जावं आहे-नाही ते सारं सोडूऩ विचार भयाण होता. वेळच तशी होती. समोर आयुष्याचा सारा काळोखच दिसत होता़ एवढं मोठं यश मिळवल्याचा आनंद क्षणिक वाटला. पण ते सारं मागं सोडणं कठीण वाटत होतं. निराशेनं ग्रासलेल्या, तिशीही न गाठलेल्या या तरुणानं आत्महत्त्येचा विचार केला. याच नैराश्यात त्याला दारूचं व्यसन लागलं दारू पिऊन आपण जीवघेण्या वेगानं गाडी दामटतोय, याचंही भान त्याला राहत नव्हतं अशाच गुन्ह्यांमध्ये त्याला दोनदा पकडलं गेलं. शिवाय त्याच्या अंमली पदार्थ घेत असलेल्या फोटोनं जगाला हादरवून सोडलं. आत्महत्त्येचा विचार डोक्यात सारखा भिरभिरत होता, पण त्याचं नशीब थोर म्हणून मित्र भले मिळाले होते. त्या मित्रांनी त्याची आत्मनाशाची वाट अडवून धरली. ...आणि मग तो परतला़ परतला आणि पुन्हा त्याच तडफेनं त्यानं अनेक विक्रम केले़ तो तरुण म्हणजे अमेरिकेचा महान जलतरणपटू मायकेल फेल्प्स. आपल्या संपूर्ण कारकिर्दित फेल्प्सने २३ सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्य मिळविले.रिओ ऑलिम्पिकमध्ये ठरवलेली यशाची शिखरं सहज सर केल्यानंतर फेल्प्सने स्पर्धात्मक खेळांतून निवृत्ती जाहीर केली आहे. फेल्प्सनं अनेक देशांपेक्षा अधिक सुवर्णपदकं एकट्याच्या नावावर करून घेतली आहेत. अमेरिकेतल्या बाल्टीमोर शहरात जन्मलेला फेल्प्स हे घरातलं शेंडेफळ. त्याला दोन मोठ्या बहिणी. आई हेडमास्तर अन् वडील निवृत्त पोलीस. त्याच्या दोन्ही बहिणी जलतरणात मास्टर होत्या़ त्यांना पाहून सातव्या वर्षीपासून फेल्प्स पाण्यात उतरला. पोहायला शिकला़ रोज आपल्या बहिणींचा सराव पाहूनच मोठा झाला़ आपल्या बहिणींपेक्षा अधिक चांगलं पोहता आलं पाहिजे हेच त्याचं सुरुवातीचं ध्येय होतं. खरं तर त्याला पाण्यात उडी मारल्यानंतर त्यात जास्त वेळ चेहरा ठेवायला आवडत नाही़ नाका-तोंडात पाणी जाण्याची त्याला भीती वाटे. त्यामुळं सराव करतानाही तोंड पाण्यात कमीत कमी वेळ ठेवण्याचा त्याचा शिरस्ता असे. पाहता पाहता तो पोहण्यात इतका पारंगत झाला की त्यानं दहाव्या वर्षीच एक राष्ट्रीय विक्रम नोंदवून ठेवला़ त्याच वर्षी त्याला बॉब बाउमन नावाचे प्रशिक्षक मिळाले अन् त्याच्या स्विमिंगच्या करिअरला कलाटणी मिळाली. तेच त्याचे आवडते प्रशिक्षक बनले. ह्यह्यत्यांच्याशिवाय मी पाण्यातच उतरणार नाहीह्णह्ण, असं आजही फेल्प्स म्हणतो़ बॉब त्याला सॉलिटरी मॅन म्हणतात. एकाकी माणूस. त्यांच्या मते या पोराचं एकच ध्येय असतं. पाण्यात उतरल्यावर शक्य तितक्या लवकर अंतर पार करायचं. वडिलांनी त्याच्या आईशी घटस्फोट घेतल्यानंतर फेल्प्स एकटा पडला़ त्याला कुटुंबात राहणंही शक्य वाटेनासं झालेलं़ तेव्हा प्रशिक्षक बॉबनं त्याला वडीलकीचा आधार दिला़ बॉबनंच त्याला मोठं केलं. त्यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर ह्यफ्लाइंग फिशह्ण बनलेला फेल्प्स एक-एक सुवर्णपदकांवर नाव कोरत गेला. त्यानं स्वत:च्या नावावर एवढी ऑलिम्पिक पदकं नोंदवून ठेवली आहेत की अनेक देशांच्या अख्ख्या आॅलिम्पिक संघांनाही त्याला गाठणं मुश्कील व्हावं! खरं तर या यशाच्या उन्मादात सुरुवातीच्या काळात फेल्प्स वाहवत गेला. कधी-कधी तो भरघोस दारू ढोसायचा. तसाच गाडी दामटायचा़ पोलिसांनी त्याला २००४ साली असंच ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या अपराधापोटी पकडलं. त्यावेळी तो दोषीही ठरला आणि १८ महिन्यांची शिक्षा झाली़ शिवाय २५० डॉलरचा दंडही भरावा लागला. शिवाय मदर्स अगेन्स्ट ड्रंक ड्रायव्हिंगच्या शिबिरात सक्तीच्या समाजसेवेसाठी जावं लागलं. त्यानंतर पाच वर्षांनी फेल्प्सचा एक फोटो व्हायरल झाला. त्या फोटोत तो अंमली पदार्थ घेताना दिसत होता़ हा फोटो खोटा-बनावट असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं होतं. पण तो खरा असल्याचं आणि एका पार्टीत घेतला गेल्याचं त्यानं कबूल केलं. या फोटोचा मोठा फटका फेल्प्सला बसला. केलाँग नावाच्या कंपनीनं त्याचं प्रायोजकत्व काढून घेतलं; शिवाय अमेरिकेच्या स्विमिंग संघटनेनं फेल्प्सवर तीन महिन्यांची बंदीही घातली़ असाच अनुभव एकदा दोन वर्षांपूर्वी आला होता़ फेल्प्सला अटक झाली होती़ कारण पुन्हा त्यानं अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवलं होतं. पुन्हा एकदा सहा महिन्यांची बंदी त्याच्यावर ओढवली़ याच काळात त्याला नैराश्यानं ग्रासलं इतकं की तो आत्महत्त्येचाही विचार करत होता़ आता काहीच शिल्लक राहिलं नाही... कमबॅक करणं शक्य नाही अशा नकारार्थी विचारांनी त्याला घेरलं होतं. यातून बाहेर पडण्यासाठी फेल्प्सला मित्रांनी मदत केली़ सहा महिने मेडिटेशन करायला लावलं. त्यातून तो बाहेर पडला. माणूस बनला. पुन्हा नव्या जोशानं पाण्यात उतरला़. आताच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे नवे टोक गाठून त्यानं थांबायचं ठरवलंय़ आता तो एक लेकराचा बाप बनलाय आणि त्याचा चांगला सांभाळ त्याला करायचाय़ अन् चांगली पिढी घडवायचीय, खेळाचं चांगलं वातावरण निर्माण करायचंय़. फेल्प्स ३०० कोटींचा धनीमायकेल फेल्प्स भलेही यशाच्या शिखरावर असेल आणि त्यानं मिळवलेल्या सुवर्णपदकांची संख्या विक्रमी असेल पण त्याची कमाई एखाद्या स्टार फुटबॉलपटूपेक्षा कमीच आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची मँचेस्टर युनायटेड संघात असण्याची फी ६०० कोटी रुपये आहे़ आणि फेल्प्सचं प्रायोजकांमधून मिळणारं उत्पन्न ३०० कोटी़ कधीकधी वर्षाला दुप्पट कमाई दाखवणारे आकडेही आहेत पण ते सारे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न आहे़ त्यातून जाणारा कर आणि इतर खर्च वगळता फेल्प्सला ३०० कोटींच्या आसपास समाधान मानावं लागतं. अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा मात्र फेल्प्सचं उत्पन्न ३८ टक्के अधिक आहे़.