शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

मधुमेह, लठ्ठपणा अन् हृदयरोग असेल तर मिळणार नाही अमेरिकेचा व्हिसा, स्थलांतरण रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:49 IST

United State News: अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्यासाठी किंवा अमेरिकेत ग्रीन कार्ड असलेल्यांना ट्रम्प प्रशासनाच्या नव्या व्हिसा नियमांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या परदेशी नागरिकांना किंवा अमेरिकेत राहणाऱ्या ग्रीनकार्डधारकांना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोगसारखे अन्य गंभीर आजार आहेत, ते अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरतील, असे निर्देश अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने आपले दूतावास व कॉन्सुलर अधिकाऱ्यांना दिले आहेत. आजाराग्रस्त परदेशी नागरिकांच्या उपचाराचा खर्च अमेरिकेच्या तिजोरीवर पडू नये व अन्य संसाधनांवर त्यांच्यावर भार पडू नये, म्हणून हे निर्देश आहेत.

ज्यांची आर्थिक ऐपत त्यांचा विचारज्या परदेशी नागरिकांची वा ग्रीनकार्ड धारकांची त्यांच्या जडलेल्या आजारावर उपचार करण्याची आर्थिक ऐपत असेल, त्यांचा आर्थिक व सामाजिक भार अमेरिकेच्या संसाधनांवर पडत नसेल तर अशांचे व्हिसा अर्ज काळजीपूर्वक पाहून त्यावर निर्णय घ्यावा, असेही निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. अमेरिकेत अद्ययावत उपचार मिळतात. तेथे विमा कंपन्यांव्यतिरिक्त सरकार उपचारांवरचा खर्च मोठ्या प्रमाणात उचलते. 

कोणकोणते आजार?हृदय व रक्ताभिसरणसंबंधी रोग, श्वसनाचे रोग, कर्करोग, मधुमेह, चयापचय रोग, मेंदूविषयक आजार आणि मानसिक आरोग्य स्थिती यांचा निर्देशांत समावेश आहे. हे आजार बरे करण्यास प्रचंड पैसा खर्च होतो, असे अमेरिकेच्या गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. अमेरिकेचा व्हिसा मिळवताना काही रोगांच्या लसी घेणे बंधनकारक आहे. ती प्रक्रियाही सुरूच राहणार आहे. आताचे बदल नव्हेत.

English
हिंदी सारांश
Web Title : US Visa Denied for Diabetics, Obese, and Heart Patients: Trump Order

Web Summary : New US visa rules may deny entry to immigrants with diabetes, obesity, or heart disease. The directive aims to prevent financial burden on US healthcare resources. Those with sufficient financial means for treatment may still be considered.
टॅग्स :Healthआरोग्यUnited Statesअमेरिका