शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

विजय माल्ल्याला इंग्लंडच्या न्यायालयाचा दणका, ठोठावला 579 कोटी रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 9:25 PM

बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याला इंग्लंडच्या न्यायालयानं जोरदार धक्का दिला आहे.

नवी दिल्ली- बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्याला इंग्लंडच्या न्यायालयानं जोरदार धक्का दिला आहे. किंगफिशर एअरलाइन्सनं सिंगापूरस्थित बीओसी एव्हिएशनला 90 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 579 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठीही भारत सरकार प्रयत्न करतेय.इंग्लंडच्या उच्च न्यायालयात किंगफिशरनं भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानासंदर्भात खटला सुरू होता. त्यावेळी न्यायाधीशांनी 62 वर्षीय माल्ल्यांच्या कंपनीला हा दंड ठोठावला आहे. दंड का ठोठावू नये, यासंदर्भात न्यायालयानं विचारलेल्या प्रश्नाला माल्यांच्या वकिलांना उत्तर देता आले नाही. या खटल्यात बीओसी एव्हिएशननं युनायटेड ब्रुअरीज व किंगफिशर एअरलाइन्सला प्रतिवादी केले होते. बीओसी एव्हिएशनला अनुकूल निकाल दिल्यानंतर न्यायालयानं माल्याला ही रक्कम, दंड व कायदेशीर कारवाईचा खर्च असं मिळून किंगफिशरनं बीओसीला 90 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 579 कोटी रुपये द्यावेत, असं म्हटलं आहे. दुसरी कंपनी युनायडेट ब्रुअरीज ही दंडाची अर्धी रक्कम देण्यासाठी बांधील असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.बीओसी एव्हिएशन व किंगफिशर एअरलाइन्स यांच्यात चार विमानं भाडेपट्ट्यावर देण्याबाबत करार करण्यात आला होता. करारानुसार त्यातील तीन विमानं किंगफिशरला भाडेतत्त्वावर दिली होती. मात्र एक विमान देणं शिल्लक ठेवलं होतं. आधीच्या विमानांचे पैसे किंगफिशर एअरलाइन्सकडून न आल्यानं चौथ्या विमानाची डिलिव्हरी देण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. त्याप्रमाणेच बीओसी एव्हिएशनच्या दाव्यानुसार सुरक्षेसाठी दिलेली अनामत रक्कम किंगफिशरकडून येणं असलेल्या रकमेपेक्षा कमी होती. त्यामुळे या कंपनीनं या रकमेच्या वसुलीसाठी इंग्लंडच्या कोर्टात खटला दाखल केला होता. अखेर न्यायालयानं बीओसी एव्हिएशनच्या बाजूनं निकाल देत किंगफिशरला दणका दिला होता. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या