युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहरीनमध्ये झालेल्या हल्ल्यातून पाटणा येथील रहिवासी दीपक कुमार आणि त्यांची पत्नी पूजा थोडक्यात वाचले आहेत. दीपक हे मूळचे सहरसा येथील रहिवासी असून सध्या कामाच्या निमित्ताने बहरीनमध्ये राहत आहेत. नुकताच इराणने बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळावर जो हल्ला केला, त्याचे पडसाद दीपक यांच्या घराजवळही उमटले, ज्यामुळे हे दाम्पत्य प्रचंड घाबरलं आहे.
दीपक आणि त्यांच्या पत्नीने 'आजतक'शी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधताना सांगितलं की, जेव्हा बॉम्ब फेकायला सुरुवात झाली तेव्हा सर्वत्र गोंधळ आणि पळापळ झाली होती. स्फोटांचे भयानक आवाज ऐकताच त्यांनी तातडीने घर सोडलं आणि सुरक्षित ठिकाणाकडे धाव घेतली. सध्या त्यांनी बहरीनमध्येच आपल्या एका जुन्या मित्राच्या घरी आश्रय घेतला आहे. तिथली परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून ते खूप घाबरलेले आहेत.
भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत
व्हिडीओ कॉलवर बोलताना दीपक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना कळकळीचं आवाहन केलं आहे की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे भारतात परत आणलं जावं. ते आणि त्यांची पत्नी सतत भीतीखाली जगत असल्याचं त्यांनी सांगितलं. "मोदीजी-नितीशजी, आम्हाला सुरक्षित भारतात आणा" असं म्हटलं आहे.
"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता
पाटणामध्ये दीपक यांचं कुटुंब अत्यंत काळजीत आहे. त्यांची आई आशा प्रसाद, बहीण डॉली भगत, मोठा भाऊ राजेश कुमार आणि पुतणी सारा गोपाळ यांनी सांगितलं की, जेव्हापासून हल्ल्याची बातमी मिळाली आहे, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब तणावाखाली आहे. कुटुंबातील सदस्य दीपक यांच्याशी सतत संपर्कात आहेत, मात्र तरीही प्रत्येक क्षणी काहीतरी अघटित घडण्याची भीती त्यांना सतावत आहे.
"अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल
कुटुंबीयांनी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती केली आहे की, बहरीन आणि इतर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी विशेष पावलं उचलली जावीत. सध्या दीपक आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित असलं तरी परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांच्या कुटुंबाची चिंता कायम आहे.
Web Summary : An Indian couple in Bahrain narrowly escaped an Iranian attack. They appeal to Modi and Nitish Kumar for safe repatriation to India, citing constant fear. Their family in Patna is deeply worried, urging government intervention to evacuate stranded Indians.
Web Summary : बहरीन में एक भारतीय दंपति ईरानी हमले में बाल-बाल बचा। उन्होंने मोदी और नीतीश कुमार से भारत में सुरक्षित वापसी की अपील की, और लगातार डर का हवाला दिया। पटना में उनका परिवार चिंतित है, और सरकार से फंसे भारतीयों को निकालने का आग्रह किया है।