शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पेटंट प्रकरणी ‘अ‍ॅपलला’ न्यायालयाचा दणका

By admin | Updated: October 18, 2015 02:00 IST

पेटंटच्या उल्लंघन प्रकरणात विस्कॉन्सिन विद्यापीठाला २३.४ कोटी डॉलर देण्याचा आदेश येथील एका संघीय न्यायालयाने ‘अ‍ॅपल’च्या एका शाखेला दिला आहे.

वॉशिंग्टन : पेटंटच्या उल्लंघन प्रकरणात विस्कॉन्सिन विद्यापीठाला २३.४ कोटी डॉलर देण्याचा आदेश येथील एका संघीय न्यायालयाने ‘अ‍ॅपल’च्या एका शाखेला दिला आहे.हे प्रकरण विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या मायक्रो प्रोसेसर तंत्रज्ञानाशी निगडित आहे. ते विकसित करण्यात भारतीय वंशाच्या दोन अमेरिकी नागरिकांचा मोठा वाटा होता. जिवजयकुमार व गुरिंदरसिंग सोही, अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी राजस्थानातील बिर्ला इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या संस्थेतून पदविका घेऊन अमेरिकेत वास्तव्य केले आहे. ‘अ‍ॅपल’ने ‘विस्कॉन्सिन अ‍ॅल्युमनी रिसर्च फाऊंडेशन’च्या पेटंटचे उल्लंघन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. हे तंत्रज्ञान आपण विकसित केल्याचा दावा ‘अ‍ॅपल’ने केला होता. या तंत्रज्ञानाने कॉम्प्युटरची क्षमता, गती वाढते. या प्रकरणी दोन आठवडे सुनावणी झाली. त्यात अ‍ॅपलच्या ए-७, ए-८ आणि ए-८ एक्स प्रणालीच्या चिपच्या डिझाईनने या विद्यापीठाच्या पेटंटचे उल्लंघन होते, असे आढळून आले. त्यानंतरच न्यायालयाने २३.४ कोटी डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला. या विद्यापीठातील प्रोफेसर सुरिंदरसिंह सोही म्हणाले की, आमचे तंत्रज्ञान काळाच्या फारच पुढे होते, तेच अ‍ॅपलने वापरले होते. (वृत्तसंस्था)