तालिबानचा पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा, आज सरकार स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:07 AM2021-09-04T08:07:54+5:302021-09-04T08:08:27+5:30

Taliban in Afghanistan: पंजशीरमध्ये अहमद मसूद (Ahmad Massoud) यांच्या नेतृत्वाखाली तालिबानवर कारवाई सुरू आहे.

panjshir was also captured by taliban, reports | तालिबानचा पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा, आज सरकार स्थापन करणार

तालिबानचा पंजशीरवरही कब्जा केल्याचा दावा, आज सरकार स्थापन करणार

Next

काबूल : अफगाणिस्तानमध्येतालिबान सरकार स्थापनेच्या घोषणेच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी तालिबानने दावा केला की त्यांनी पंजशीरवरही (Panjshir) कब्जा केला आहे.  मात्र, तालिबानच्या पंजशीरबाबतच्या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पंजशीरमध्ये अहमद मसूद (Ahmad Massoud) यांच्या नेतृत्वाखाली तालिबानवर कारवाई सुरू आहे. या भागात मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, तालिबानने आता संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टमध्ये तालिबानच्या तीन सूत्रांचा हवाला देऊन म्हटले आहे. तालिबानचा एक कमांडर म्हणाला, "अल्लाहच्या कृपेने आम्ही संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. अडचणी निर्माण करणाऱ्यांचा पराभव झाला असून पंजशीर आमच्या ताब्यात आहेत.' 

दरम्यान, माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडल्याचे वृत्त येत आहे. मात्र, रिपोर्टनुसार, अमरुल्लाह सालेह यांनी हे वृत्त फेटाळले. अमरुल्लाह सालेह यांनी टोलो न्यूजला सांगितले की, देश सोडून पळून गेल्याचे वृत्त खोटे आहे. बीबीसी वर्ल्डच्या पत्रकाराने ट्विटरवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ अमरुल्लाह सालेह यांनी पाठवल्याचे सांगण्यात आले. 

या व्हिडिओमध्ये म्हणाले की, 'आम्ही कठीण परिस्थितीत आहोत यात शंका नाही. आमच्यावर तालिबानने हल्ला केला आहे... आम्ही त्यांच्याशी लढाई करत आहोत.' याचबरोबर, अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रतिकार चालू आहे आणि चालू राहील. मी माझ्या मातीसह इथे आहे, माझ्या मातीसाठी उभा आहे आणि त्याच्या सन्मानाचे रक्षण करत आहे.

दरम्यान, शुक्रवारी तालिबानने नवीन अफगाणिस्तान सरकारच्या स्थापनेची तारीख एका दिवसासाठी पुढे ढकलली होती. नवीन अफगाणिस्तान सरकारची स्थापना जी शुक्रवारी केली जाणार होती, ती आता एक दिवस उशिरा होणार आहे, असे तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी शुक्रवारी सांगितले. मुजाहिद म्हणाले की, नवीन सरकारच्या स्थापनेची घोषणा आता शनिवारी (आज) केली जाईल. सूत्रांनी सांगितले की कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे अध्यक्ष मुल्ला अब्दुल गनी बरदार हे तालिबान सरकारचे प्रमुख असण्याची शक्यता आहे.

नव्या अफगाण सरकारच्या प्रमुखपदी धुरा बरादर
अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचे नेतृत्व तालिबानचे सह संस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर हे करतील, असे इस्लामिक गटातील सूत्रांनी शुक्रवारी म्हटले. नव्या सरकारची घोषणा शनिवारी केली जाणार आहे. बरादर हे तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत मुल्ला मोहम्मद याकूब, शेर मोहम्मद अब्बास स्टॅनकेझाई असतील. तालिबानचे सहसंस्थापक दिवंगत मुल्ला ओमर यांचे मुल्ला याकूब हे चिरंजीव आहेत. हे ज्येष्ठ नेते काबूलमध्ये आले असून नव्या सरकारच्या घोषणेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. तालिबानचे सर्वोच्च धार्मिक नेते हैबतुल्लाह अखूनझादा हे धार्मिक विषयांवर आणि सरकारवर इस्लामच्या चौकटीत लक्ष ठेवतील.

Web Title: panjshir was also captured by taliban, reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.