पाकिस्तानची लढाऊ विमाने आणि भारताची ब्रम्होस पुन्हा भिडणार...; ट्रम्पनी ३७ वर्षांचे युद्ध थांबवले पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:56 IST2025-08-09T11:56:03+5:302025-08-09T11:56:40+5:30
India Vs Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर लाँच केले होते. यावेळी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करताना पाकिस्तानची लढाऊ विमाने JF-17 थंडर आड आली होती. त्यांना भारताच्या ब्रम्होस मिसाईलची चांगलेच पाणी पाजले होते.

पाकिस्तानची लढाऊ विमाने आणि भारताची ब्रम्होस पुन्हा भिडणार...; ट्रम्पनी ३७ वर्षांचे युद्ध थांबवले पण...
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर लाँच केले होते. यावेळी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करताना पाकिस्तानची लढाऊ विमाने JF-17 थंडर आड आली होती. त्यांना भारताच्या ब्रम्होस मिसाईलची चांगलेच पाणी पाजले होते. या दोन देशांतील लढाई थांबली असली तरी या लढाऊ विमाने आणि ब्रम्होस मिसाईलमध्ये पुन्हा पुन्हा भिडण्याची वेळ येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमधील गेल्या ३५ वर्षांपासून सुरु असलेले युद्ध थांबविल्याची घोषणा केली आहे. हेच देश पाकिस्तान, भारताकडून शस्त्रे खरेदी करत आहेत.
ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात चीनची झोप उडवली आहे. पाकिस्तानच्या मालकीची असलेली परंतू चीनने बनविलेली विमाने, एअर डिफेन्स सिस्टीम आणि ड्रोन याच मिसाईलने उध्वस्त केली होती. आता हेच घातक मिसाईल चीनच्या शेजारील फिलीपिन्सने खरेदी केले असून नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट देखील केले आहे. आता आर्मेनिया देखील ब्रम्होस मिसाईल खरेदी करत आहे. आशियातील अनेक देश या मिसाईलची शक्ती पाहून प्रभावित झाले आहेत. व्हिएतनाम आणि इंडोनेशिया भारतासोबत चर्चा करत आहेत. तर आर्मेनिया, थायलंड, सिंगापूर, ब्रुनेई, इजिप्त, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान, ब्राझील, चिली, अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला हे देश चर्चेची तयारी करत आहेत.
अझरबैजानला देण्यासाठी पाकिस्तानने मोठी डील केली आहे. चीनमध्ये बनवलेले ४० जेएफ-१७ थंडर लढाऊ विमाने देण्यात येणार आहेत. आता आर्मेनिया त्या विमानांना पछाडणारी विमाने Su-३०MKI ही भारताकडून खरेदी करणार आहे. ही विमाने ब्रम्होस मिसाईल डागणारी आहेत, यामुळे आर्मेनिया ब्रम्होस मिसाईल देखील खरेदी करणार आहे. आर्मेनियाचा भारतावर प्रचंड विश्वास आहे. २०२० मध्ये अझरबैजानशी झालेल्या युद्धानंतर भारत आणि फ्रान्सने आर्मेनियाला सर्वात जास्त मदत केली होती. आर्मेनियाला राफेल परवडणारे नाही, यामुळे भारताचे सुखोई त्यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. आर्मेनियाने भारताची आकाश-१एस हवाई संरक्षण प्रणाली देखील खरेदी केली आहे. एवढेच नाही तर पिनाका मिसाईलची देखील ऑर्डर दिली आहे. याचसोबत अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टम (ATAGS), जेन अँटी-ड्रोन सिस्टम, स्वाती वेपन-लोकेटिंग रडार, कोंकर्स अँटी-टँक गाईडेड मिसाईल (ATGM)देखील मागविले आहेत.