शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:16 IST

महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील हा गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधाऱ्यांनी पॅसेंजर ट्रेनवर गोळीबार केला. यात 39 जणांचा मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील हा गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

संबंधित वाहनांचा ताफा पाराचिनारहून पेशावरकडे जात असताना कुर्रम जिल्ह्यातील उचाट भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केला.

या घटनेची माहिती देताना खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी म्हणाले, “कुर्रम आदिवासी जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

पाराचिनारचे स्थानिक रहिवासी झियारत हुसैन यांनी दूरध्वनीवरून रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “प्रवासी वाहनांचे दोन ताफे होते. एक ताफा पेशावरकडून पाराचिनारकडे, तर दुसरा पाराचिनारकडून पेशावरकडे जात होता. याच वेळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.” यावेळी झियारत हुसैनचे नातलग पेशावरहून पाराचिनारला जात होते.पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रामुख्याने बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा निषेध केला आणि पीडितेच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादDeathमृत्यू