पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:28 IST2025-08-12T17:26:06+5:302025-08-12T17:28:16+5:30

दक्षिण कोरियामध्ये या दहशतवाद्याने सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधील दक्षिण कोरियाच्या वाणिज्य दूतावासातून मिळवलेल्या व्हिसाचा वापर करून डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण कोरियामध्ये प्रवेश केला होता.

Pakistani terrorist reached South Korea, changed identity and was working in a company; terrorist arrested | पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पाकिस्तानमधीलदहशतवादी जगभरात लपून बसले आहेत. भारत गेल्या अनेक दशकांपासून पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध लढत आहे. पण आता पाकिस्तानीदहशतवादी दक्षिण कोरियापर्यंत पोहोचले आहेत. दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी सोलच्या इटावॉन जिल्ह्यात एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक केली आहे, दक्षिण कोरियामध्ये एका दुकानामधून दहसतवाद्याला ताब्यात घेतले आहे. हा दहशतवादी २००८ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. 

मिळालेल्या महितीनुसार, हा दहशतवादी आपली ओळख बदलल्यानंतर स्थानिक बाजारपेठेतील एका दुकानात काम करत होता. ग्योंगी नंबू प्रांतीय पोलिस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ४० वर्षीय संशयिताला दहशतवाद विरोधी कायदा आणि इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. त्याला २ ऑगस्ट रोजी सोलमधील इटावोन-डोंग येथे पकडण्यात आले, तिथे तो स्थानिक बाजारपेठेत काम करत होता.

आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा

संशयित २०२० मध्ये पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला, त्याने शस्त्रे वापरण्याचे आणि घुसखोरीच्या युक्त्यांचे प्रशिक्षण घेतले आणि तो संघटनेचा अधिकृत सदस्य बनला. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमधील दक्षिण कोरियाच्या वाणिज्य दूतावासातून मिळालेल्या व्हिसाचा वापर करून तो डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण कोरियामध्ये दाखल झाला. तो देशात व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एका व्यावसायिका म्हणून दक्षिण कोरियामध्ये आला होता.

दक्षिण कोरियात पहिल्यांदाच दहशतवादी पकडला

दक्षिण कोरियामध्ये या दहशतवाद्याने कोणतीही दहशतवादी घटना घडवून आणली नसली तरी लष्कर-ए-तोयबाशी त्याचे संबंध दहशतवाद विरोधी कायद्याच्या कलम १७ चे उल्लंघन करतात, हे दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यास मनाई करते. संशयिताने हे आरोप फेटाळले आहेत.

त्याने लष्करला पैसे पाठवले का, याचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकारी तपास करत आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या गटाच्या सदस्याला कोरियन पोलिसांनी अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई हल्ल्यामागे लष्करचा हात

मे २००५ मध्ये, अल-कायदा, ओसामा बिन लादेन किंवा तालिबानशी संबंध असल्याने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्यांनी बिन लादेन आणि या संघटनांना पाठिंबा दिला, तसेच दहशतवादी कारवायांना निधी दिला आणि त्यांच्या प्रॉक्सी संघटने, जमात-उद-दावा द्वारे दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण, रसद आणि पायाभूत सुविधा पुरवल्या.

Web Title: Pakistani terrorist reached South Korea, changed identity and was working in a company; terrorist arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.