VIDEO : पाकिस्तानी खासदाराने 'टिप टिप बरसा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, नाराज झाले PAK फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:55 IST2022-01-06T15:55:08+5:302022-01-06T15:55:37+5:30
Pakistani MP Aamir Liaquat Hussain Dance : या व्हिडीओत आमिर कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचं गाणं 'टिप टिप बरसा पाणी'वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

VIDEO : पाकिस्तानी खासदाराने 'टिप टिप बरसा' गाण्यावर केला जबरदस्त डान्स, नाराज झाले PAK फॅन्स
पाकिस्तानी (Pakistan) नॅशनल असेम्बलीचे सदस्य आणि टीव्ही होस्ट आमिर लियाकत हुसैनचा (Aamir Liaquat Hussain) एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video Viral) झाला आहे. या व्हिडीओत आमिर कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचं गाणं 'टिप टिप बरसा पाणी'वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण पाकिस्तानी जनता याने नाराज झाले आहेत.
आमिर लियाकत हुसैनचा हा व्हिडीओ तैमूर जमून नावाच्या एका सोशल मीडिया यूजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आमिर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. एखाद्या ट्रेन्ड डान्सरसारखा तो डान्स करत आहे. एका खासदाराचा असा डान्स पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे. पण बरेच पाकिस्तानी यूजर्सना खासदाराचा हा अंदाज आवडला नाही.
एका यूजरने आमिर लियाकत हुसैनचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, 'मित्रांनो, हे आहेत पाकिस्तानचे मेंबर ऑफ पार्लमेंट'. यावर एका महिलेने उत्तर देत लिहिलं की, कदाचित हे खासदार नाहीत. पण त्यांच्या डान्स स्टेप भारी आहेत. मात्र, अजून हे समजू शकलेलं नाही की, आमिरने हा डान्स कोणत्या कार्यक्रमात केला.
Tip Tip Barsa Paani 🔥🔥🔥 pic.twitter.com/0IBo4J4oqq
— Taimoor Zaman (@taimoorze) January 5, 2022
दरम्यान, आमिर लियाकत हुसैनचा डान्स व्हायरल होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी तो नागिण डान्स करताना दिसला होता आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोबतच 'जीवे पाकिस्तान'शोमध्येही त्याने डान्स केला होता. आमिर लियाकत हुसैन पंतप्रधान इमरान खान यांची पार्टी तहरीक-ए-इन्साफचे सदस्य आहेत.