इस्लामाबाद - पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानी नेत्यांचा थयथयाट झाल्याचं दिसून येते. त्यातूनच पाकचे नेते बरीच हास्यास्पद विधाने करत आहेत. पाकिस्तानी महिला सिनेटर पलवाशा खान, ज्या पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांची गुप्तहेर म्हटलं जाते. तिने पाकिस्तानी संसदेत भारताविरोधात जे विधान केले ते ऐकून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. पिंडीचा एक सैनिक बाबरी मस्जिदीची वीट रचेल आणि असीम मुनीर पहिली अजान देतील असं विधान पलवाशा खान यांनी केले आहे.
पाकिस्तानी अभ्यासक्रमात भारत, विशेषत: हिंदूविरोधात द्वेषाचे शिक्षण दिले जाते, तेच शिक्षण घेत पलवाशा खान पाकिस्तानी संसदेत पोहचली. त्यामुळे पलवाशा खान यांना इतिहास आणि भूगोलचा अर्थ माहिती नसल्याचं दिसते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक यांच्यात युद्धाची परिस्थिती असताना त्यात पलवाशा खान म्हणाल्या की, ती वेळ आता दूर नाही जेव्हा बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानचा सैनिक रचेल. त्यात पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील असं त्यांनी म्हटलं.
पलवाशा खान कोण?
पलवाशा खान पाकिस्तानी महिला सिनेटर आहे. ती आसिफ अली जरदारी यांच्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीची नेता आहे. तिला पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारी यांची जासूस गर्लही म्हटलं जाते. पलवाशा खान गर्भवती राहिल्यानंतर माजी डीजीआयएसआयचे लेफ्टिनंट जनरल जहीर उल इस्लाम यांना तिच्याशी जबरदस्तीने लग्न करावे लागले होते असं माजी अधिकारी आदिल राजा यांनी सांगितले. पलवाशा खान पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहातील सदस्य आहे. २००८ ते २०१३ पर्यंत ही पाकिस्तानी संसदेत खासदार होती. त्याशिवाय पलवाशा खान पीपीपी पक्षाची इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे.
दरम्यान, पलवाशा खान इतक्यावरच थांबली नाही तर तिने आणखीही बरीच विधाने केली. पाकिस्तानकडे केवळ ७ लाखांची सैन्य फौज नाही. आमच्याकडे २५ कोटी देशभक्त नागरिकांचे समर्थन आहे. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर रक्ताने रंगेल. जो पाकिस्तानवर वाईट नजर टाकेल त्याचे डोळे काढून टाकू अशा पोकळ धमक्याही दिल्या आहेत.