Imran Khan X-Wife Marriage: इम्रान खानच्या एक्स बायकोने केले तिसरे लग्न; नवऱ्याचा फोटो पोस्ट करत लगावला टोला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:06 IST2022-12-23T16:06:09+5:302022-12-23T16:06:30+5:30
ब्रिटिश पाकिस्तानी पत्रकार रेहम खान हिने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'जस्ट मॅरिड' असा फोटो पोस्ट करून तिने याची घोषणा केली.

Imran Khan X-Wife Marriage: इम्रान खानच्या एक्स बायकोने केले तिसरे लग्न; नवऱ्याचा फोटो पोस्ट करत लगावला टोला...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटर इम्रान खानच्या एक्स बायकोने तिसरे लग्न केले आहे. ब्रिटिश पाकिस्तानी पत्रकार रेहम खान हिने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'जस्ट मॅरिड' असा फोटो पोस्ट करून तिने याची घोषणा केली.
अखेर मला असा जिवनसाथी मिळालाय, ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकेन, असे तिने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पाकिस्तानी पत्रकार मिर्झा बिलाल याच्याशी रेहम खानचे लग्न झाले आहे. तिने तिसरा पती मिर्झासोबत एक फोटो पोस्ट केला आहे.
Finally found a man who I can trust @MirzaBilal__ pic.twitter.com/nx7pnXZpO6
— Reham Khan (@RehamKhan1) December 23, 2022
रेहम खानचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी तिने 2014 मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खानसोबत लग्न केले होते. मात्र, वर्षभरानंतरच दोघांचा घटस्फोट झाला. त्यापूर्वी रेहमचे पहिले लग्न 1993 मध्ये एजाज रहमानसोबत झाले होते. 2005 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला होता.
रेहमने तिच्या लग्नाशी संबंधित अनेक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तो आणि बिलाल एकत्र पोज देताना दिसत आहेत.