पाकिस्तान सुधारणार नाही, युद्धविराम काळात अफगाणिस्तानवर गोळीबार; दोन्ही देशात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 20:30 IST2025-11-06T20:16:02+5:302025-11-06T20:30:46+5:30
पाकिस्तानने हलक्या आणि जड शस्त्रांचा वापर केला आणि नागरी भागांना लक्ष्य केले. हा गोळीबार १०-१५ मिनिटे चालला.

पाकिस्तान सुधारणार नाही, युद्धविराम काळात अफगाणिस्तानवर गोळीबार; दोन्ही देशात तणाव
काही दिवसापूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू होता. दोन्ही देशांमध्ये हल्ले झाले, यामध्ये दोन्ही दोन्ही देशांचे नुकसान झाले. यानंतर दोन्ही देशात युद्धविराम करण्यात आले. गुरुवारी युद्धबंदी असूनही पाकिस्ताननेअफगाणिस्तानवर गोळीबार केला. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर गोळीबार करण्यात आला. नाजूक युद्धबंदी मजबूत करण्यासाठी तुर्कीमध्ये दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने ही कारवाई केली.
"पाकिस्तानने हलक्या आणि जड शस्त्रांचा वापर केला आणि नागरी भागांना लक्ष्य केले." प्रत्यक्षदर्शींच्या मते, गोळीबार १०-१५ मिनिटे चालला. दोन्ही शेजाऱ्यांमध्ये युद्धबंदी आहे, परंतु पाकिस्तानमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यामुळे दोन्ही देशात तणाव वाढला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्याच्या सुरुवातीला काबूलमध्ये झालेल्या स्फोटांनंतर सीमा संघर्षात सुमारे ५० अफगाण नागरिकांसह ७० हून अधिक लोकांवर हल्ले केले. हा दोन्ही शेजारी देशांमधील काही वर्षांतील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, २०२१ मध्ये काबूलमध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यापासून, सीमापार दहशतवाद आणि सुरक्षा चिंतांवरून, त्यांचे संबंध बिघडले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी कतारमध्ये दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती, परंतु गेल्या आठवड्यात तुर्कीमध्ये युद्धबंदीचे तपशील अंतिम करण्याचा प्रयत्न करताना गतिरोध निर्माण झाला.