'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:17 IST2025-05-28T18:15:25+5:302025-05-28T18:17:40+5:30

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची आर्थिक व प्रशासकीय स्थिती ढासळत असल्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहे.

Pakistan, which was already in debt, took out a big company to sell after Operation Sindoor | 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!

'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!

ऑपरेशन सिंदूर’नंतरपाकिस्तानची आर्थिक व प्रशासकीय स्थिती ढासळत असल्याचे आता वेगवेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. याचा ताजा नमुना म्हणजे देशातील सर्वात मोठी आणि राष्ट्रीय विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PIACL) हिचे खाजगीकरण करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या संदर्भात पाकिस्तान सरकारने निविदा मागवण्यास सुरुवात केली असून, आता या प्रक्रियेसाठी दिलेली अंतिम मुदत ३ जूनवरून १९ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

खाजगीकरण आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही मुदतवाढ जाहीर केली आहे. त्यांनी सांगितले की, ही वाढ केवळ निविदा प्रक्रियेत अधिक गुंतवणूकदारांना सामील होण्याची संधी देण्यासाठीच नव्हे तर ईद-उल-अजहा सणाच्या पार्श्वभूमीवरही करण्यात आली आहे. उर्वरित अटी व शर्ती मात्र जशाच्यातशा राहतील. सरकार या खाजगीकरणाच्या माध्यमातून PIACL मधील ५१% ते १००% पर्यंतचा हिस्सा आणि पूर्ण व्यवस्थापनाचे नियंत्रण देण्यास तयार आहे.

का घेतला कंपनी विकण्याचा निर्णय?

पाकिस्तानी सरकारने घेतलेला हा निर्णय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF)  ‘विस्तारित निधी सुविधा’ (EFF) अंतर्गत ठरवण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. पाकिस्तान सरकारची ही पावले वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण करून परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहेत.

पूर्वीपेक्षा आता काय वेगळं आहे?

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा खरेदी व्यवहार अधिक आकर्षक बनवण्यासाठी काही नव्या सवलती जाहीर केल्या आहेत. यात नवीन विमानांवर वस्तू व सेवा कर (GST) सवलत आणि कंपनीच्या कर्जाची जबाबदारी ताळेबंदातून वगळण्याचा समावेश आहे. यामुळे संभाव्य खरेदीदाराला ‘नेट-झीरो बॅलन्स शीट’ मिळू शकेल. याशिवाय, या व्यवहारासाठी सुधारित किंमत किती असले हेही लवकरच ठरवले जाणार आहे.

पूर्वीच्या अयशस्वी खाजगीकरण प्रयत्नांच्या तुलनेत सध्याची रचना अधिक सोपी आणि पारदर्शक करण्यात आली आहे. पूर्वीच्या योजनेत ६०% शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात आले होते, त्यासोबत १५% अतिरिक्त टॉप-अप ऑफर होती. त्यावेळी कंपनीची ४५ अब्ज रुपयांची निगेटिव्ह इक्विटी आणि १८% जीएसटी या अडचणी होत्या. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विक्रीसाठी 'ईव्हाय कन्सल्टिंग एलएलसी' या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

Web Title: Pakistan, which was already in debt, took out a big company to sell after Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.