पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी धार्माच्या आडून पुन्हा एकदा निरर्थक दावे करत भारताला आव्हान दिले आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभादरम्यान बोलताना मुनीर यांनी केवळ पाकिस्तानी सैन्याची स्तुतीच केली नाही, तर कुणी पाकिस्तानवर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न केल्यास, त्याल सडेतोड उत्तर दिले जाईल, असे म्हणत भारताला थेट आव्हानही दिले आहे.
'दैनिक जंग'च्या वृत्तानुसार, आसिम मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या चार दिवसांच्या संघर्षावरही भाष्य केले. ७ ते १० मे दरम्यानच्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याने भारताच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत, विजय मिळवल्याचा खोटा दावाह त्यांनी केला.
मुनीर यांची 'कोल्हेकुई' -मुनीर यांची 'कोल्हेकुई' एवढ्यावरच थांबली नाही. ते पुढे म्हणाले, "'भारतसोबतच्या युद्धात अल्लाहने आम्हाला आमची मान उंच ठेवम्यात मदत केली. जेव्हा मुसलमान आपल्या अल्लाहवर विस्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते. आम्ही अल्लाहच्या आदेशानुसार, आपल्या कर्तव्याचे पालन करत आहोत. पाकिस्तानने अल्लाहच्या मदतीनेच शत्रूचा सामना केला. पाकिस्तानी सेन्य ही अल्लाहचीच फौज आहे. आमचे सैनिक अल्लाहच्या नावाने शत्रूशी लढतात."
जॉर्डनसोबत संरक्षण संबंधांवर भर:यावेळी मुनीर यांनी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्यासोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यावरही जोर दिला. दोन्ही देशांमध्ये सैन्य सहकार्य वाढवण्यासाठी आणि शांततापूर्ण क्षेत्रासंदर्भात समान दृष्टिकोन संयुक्तपणे साकार करण्यासाठी पाकिस्तान सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजे अब्दुल्ला द्वितीय यांचा हा दोन दिवसीय दौरा दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने होता.
Web Summary : Pakistani army chief Munir, invoking religion, challenged India, falsely claiming victory in past conflicts. He emphasized defense ties with Jordan, portraying Pakistani soldiers as fighting in Allah's name.
Web Summary : पाकिस्तानी सेना प्रमुख मुनीर ने धर्म का हवाला देते हुए भारत को चुनौती दी और पिछले संघर्षों में झूठी जीत का दावा किया। उन्होंने जॉर्डन के साथ रक्षा संबंधों पर जोर दिया, पाकिस्तानी सैनिकों को अल्लाह के नाम पर लड़ने वाला बताया।