पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:46 IST2025-07-23T10:45:15+5:302025-07-23T10:46:13+5:30

Pakistan Shaheen 3 Missile: भारताने २४ तासांत तीन मिसाईल चाचण्या घेत जगाला ताकद दाखवून दिली होती, त्यामुळे जळत असलेल्या पाकिस्तानने शाहीन -३ या मिसाईलची चाचणी २२ जुलैरोजी घेतली.

Pakistan went to test Shaheen-3...! narrowly escaped its own missile, crashed near a nuclear facility | पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली

पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली

दोन महिन्यांपूर्वी भारताविरोधात झालेल्या छोट्याशा युद्धात सपाटून मार खालेल्या पाकिस्तानने आता मिसाईलच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या मिसाईल हल्ल्यांत पाकिस्ताचा अण्वस्त्र साठा धोक्यात आला होता. या केंद्राला भारताच्या मिसाईलनी नुकसान केल्याच्या बातम्या असताना आता पाकिस्तान आपल्याच अणू केंद्रावर मिसाईल हल्ला करता करता बचावला आहे. 

भारताने २४ तासांत तीन मिसाईल चाचण्या घेत जगाला ताकद दाखवून दिली होती, त्यामुळे जळत असलेल्या पाकिस्तानने शाहीन -३ या मिसाईलची चाचणी २२ जुलैरोजी घेतली. ही चाचणी फोल ठरली, परंतू यामुळे पाकिस्तानात मोठा धमाका होता होता राहिला. मिसाईलला दिले होते एक लक्ष्य पण उड्डाण करताच मिसाईलने दुसरेच लक्ष्य पकडले आणि त्यावर जाऊन कोसळली. हे ठिकाण पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाजी खानच्या एका अणु केंद्राजवळ होते. थोडे जरी इकडे तिकडे झाले असते तर पाकिस्तानात त्यांच्याच मिसाईलमुळे मोठा धमाका झाला असता. 

बलुचिस्तानातील डेरा बुगटी जिल्ह्यात या मिसाईलचा स्फोट झाला. या जागेपासून नागरी वसाहत देखील जवळच होती. या घटनेमुळे पाकिस्तानच्या सैन्य क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या लाजिरवाण्य़ा घटनेनंतर पाकिस्तानने या भागातील इंटरनेट तत्काळ बंद केले, तसेच प्रसारमाध्यमांनाही रोखण्यात आले. याचबरोबर लोकांनाही घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले. मिसाईल कोसळल्यानंतरचा आवाज २०-२५ किमीपर्यंत ऐकायला गेला होता. काही व्हिडीओंमध्ये लोक स्फोटानंतर पळताना दिसत आहेत. तर काहींनी भारताने ड्रोन हल्ला केल्याचे म्हटले आहे. एकंदरीतच पाकिस्तानचे अपयशामुळे लोक भयभीत झालेले आहेत. 

मिसाईलमुळे अणु केंद्राला काही नुकसान झाले का? रेडिएशन गळती झाली का याचा तपास केला जात आहे. पाकिस्तानची ही शाहीन मिसाईल २००० सालापासून निर्माण केली जात आहे. चीनचे तंत्रज्ञान वापरून ही अण्वस्त्र वाहून नेऊ शकणारी मिसाईल पाकिस्तान बनवत आहे. या मिसाईलचे हे तिसरे व्हर्जन असून ते सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे.

Web Title: Pakistan went to test Shaheen-3...! narrowly escaped its own missile, crashed near a nuclear facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.