भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 09:45 IST2025-05-10T09:42:09+5:302025-05-10T09:45:32+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आणखी एक नापाक खेळी खेळली आहे. आता पाकिस्तान अणुहल्ल्याच्या धमकीने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pakistan was shattered by India's attack! Another nefarious step by Prime Minister Shahbaz; Direct link to nuclear weapons | भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध

भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध

भारताच्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. शुक्रवारी रात्री घाबरलेल्या पाकिस्तानने दिल्लीवर फतेह-२ क्षेपणास्त्र डागले. तथापि, भारताच्या सुरक्षा कवचासमोर त्यांचे क्षेपणास्त्र फोल ठरले. हरियाणातील सिरसा येथे पाकिस्तानी क्षेपणास्त्र पाडण्यात आले आहे. आपले सर्व हल्ले अयशस्वी होताना पाहून पाकिस्तान हताश झाला आहे. या भीतीच्या वातावरणात, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आणखी एक नापाक खेळी खेळली आहे. आता पाकिस्तान अणुहल्ल्याच्या धमकीने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी नॅशनल कमांड अथॉरिटीची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही तीच संस्था आहे, जी पाकिस्तानकडून अण्वस्त्रांच्या वापराबाबत निर्णय घेते. या कारवाईमुळे केवळ प्रादेशिक सुरक्षाच गंभीर धोक्यात आली नाही, तर पाकिस्तानच्या हेतूंबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

काय म्हणतंय पाकिस्तान? 

बैठकीची पुष्टी करताना, पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी रॉयटर्सला सांगितले की, "आम्हाला आशा आहे की भारत आता तणाव कमी करण्याच्या दिशेने पुढे जाईल आणि हा संवाद राजनैतिकतेकडे जाईल. आम्हाला अणुऊर्जेचा उंबरठा ओलांडलेला पहायचा नाही.”

आधीही अवलंबलेली रणनीती!

पाकिस्तानी पंतप्रधानांचे हे पाऊल एखाद्या धमकीपेक्षा कमी नाही. जेव्हा पाकिस्तानला लष्करी आघाडीवर योग्य उत्तर मिळाले आणि त्यांचे सर्व हल्ले अयशस्वी झाले, तेव्हा आता ते अणुऊर्जेचा हवाला देऊन आता पाकिस्तान भीती आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वीही त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धानंतर आणि २०१९च्या बालाकोट हल्ल्यानंतर ही रणनीती अवलंबली होती. 

दरम्यान, इस्लामाबादमध्ये भीतीचे वातावरण स्पष्टपणे दिसून येत आहे. इंधनाच्या कमतरतेमुळे पाकिस्तान सरकारने राजधानीतील सर्व पेट्रोल पंप ४८ तासांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. देशभरात अराजकता आणि संकटाचे संकेत असताना हा आदेश आला.
 

Web Title: Pakistan was shattered by India's attack! Another nefarious step by Prime Minister Shahbaz; Direct link to nuclear weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.