शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
2
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
3
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
4
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
5
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
6
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
7
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
8
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
9
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
10
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
11
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
12
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
13
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
14
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
15
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
16
मशीद पाडल्याची खोटी अफवा, मनपा कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक; दिल्लीत ११ जणांना अटक!
17
Dipu Chandra Das Case: आधी निर्घृण हत्या, नंतर झाडाला टांगून जाळलं; दीपू चंद्र दास हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत
18
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
19
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
20
Sangli: मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:51 IST

यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत

नवी दिल्ली - मागील वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूरभारताने हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला होता. त्यात भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्ताननं भीतीपोटी अमेरिकेकडे तब्बल ६० वेळा युद्ध रोखण्यासाठी विनवणी केली. पाकिस्तानने यासाठी लॉबिंगही केली होती. जवळपास ४५ कोटी पाकिस्तानने खर्च केले होते. अमेरिकन सरकारद्वारे अनेक दस्तावेज सार्वजनिक केल्यानंतर हा खुलासा झाला आहे.

यूएस फॉरेन एजंट्स रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट (FARA) अंतर्गत नवीन खुलासे उघड झालेत. त्यातून समोर आलंय की, ऑपरेशन सिंदूर फक्त थांबवले आहे परंतु पाकिस्तानी भूभागावरील हल्ले पुन्हा सुरू होऊ शकतात याची चिंता इस्लामाबादला होती. पाकिस्तान अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ व्यक्तींशी सतत संपर्कात होता आणि युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत होता. या काळात पाकिस्तान अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदतीची विनंती करत होता असंही अमेरिकन कागदपत्रांच्या अहवालातून उघड झाले.

पाकिस्तानचा खोटा दावाही उघडकीस

FARA दस्तऐवजाने पाकिस्तानचा खोटा दावाही उघड झाला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी युद्धबंदीची मागणी केली होती. खरं तर, लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती आणि विनवणी पाकिस्तानी कमांडर्सकडून आली होती. प्रत्यक्षात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या नुकसानीचा अंदाज आला होता आणि भारताच्या लष्करी सामर्थ्यासमोर ते आणखी नुकसान सहन करण्यास असमर्थ होते. म्हणूनच शेवटचा उपाय म्हणून इस्लामाबादने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मदत मागितली. हल्ले पुन्हा सुरू होण्याची भीती पाकिस्तानच्या मनात होती. 

'ऑपरेशन सिंदूर' ही भारतीय लष्कराची मोठी कारवाई

'ऑपरेशन सिंदूर' हे २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मे २०२५ च्या पहिल्या आठवड्यात राबवण्यात आले. ही एक मोठी भारतीय लष्करी कारवाई होती. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ निष्पाप लोकांचा जीव घेतला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानी हद्दीत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला होता. त्यानंतर १० मे रोजी युद्धबंदी जाहीर करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan panicked by 'Operation Sindoor,' begged US to avert war.

Web Summary : After the Pahalgam attack, India's 'Operation Sindoor' targeted terrorist camps in Pakistan. Pakistan, fearing war, pleaded with the US sixty times and spent ₹45 crore lobbying. Documents reveal Pakistan sought US help, falsely claiming India requested a ceasefire after suffering heavy losses.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प