India Pakistan news: भारत आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबाराच्या घटनाही सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानातील रावळपिंडी शहरातील क्रिकेट स्टेडियमजवळ एक ड्रोन हल्ला झाला. यात मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान सुपर लीग सुरू असतानाच्या काळातच रावळपिंडी स्टेडियमजवळ एक ड्रोन हल्ला झाला. खाऊगल्लीच्या ठिकाणीच हा ड्रोन हल्ला झाला. यामुळे स्टेडियमचेही नुकसान झाले आहे.
'पाकिस्तानी पोलीस म्हणाले वीज कोसळली'
एका पाकिस्तानी नागरिकाने केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात हा नागरिक म्हणतोय की, सकाळी ड्रोन हल्ला झाला, पण पोलीस म्हणताहेत की, वीज कोसळली आहे.
'इतके नालायक लोक आहेत. सांगत आहेत की आकाशातून वीज कोसळली आहे. यांना काही लाजही वाटत नाहीये इतकं खोटं बोलत आहेत', असा हा व्यक्ती व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
पाकिस्तान नागरिकाचा व्हिडीओ बघा
ज्या ठिकाणी झाला ड्रोन हल्ला, तो व्हिडीओ बघा
पाकिस्तान सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. आज म्हणजे ८ मे रोजी रात्री ८ वाजता रावळपिंडीतील याच मैदानावर सामना होणार आहे. पेशावर जाल्मी आणि कराची किंग्ज या दोन संघात हा सामना होणार आहे.