Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:10 IST2025-05-08T17:08:17+5:302025-05-08T17:10:19+5:30
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. गुरूवारीही भारतीय लष्कराने लाहौर आणि इतर महत्त्वाच्या शहरातील एअर डिफेन्स सिस्टिमलाच लक्ष्य केले. दरम्यान, रावळपिंडी शहरातील एका स्टेडियमजवळ ड्रोन कोसळल्याची घटना घडली. पण, पोलिसांकडून ती लपवण्याचा प्रयत्न केला गेला. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
India Pakistan news: भारत आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर गोळीबाराच्या घटनाही सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी पाकिस्तानातील रावळपिंडी शहरातील क्रिकेट स्टेडियमजवळ एक ड्रोन हल्ला झाला. यात मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तान सुपर लीग सुरू असतानाच्या काळातच रावळपिंडी स्टेडियमजवळ एक ड्रोन हल्ला झाला. खाऊगल्लीच्या ठिकाणीच हा ड्रोन हल्ला झाला. यामुळे स्टेडियमचेही नुकसान झाले आहे.
'पाकिस्तानी पोलीस म्हणाले वीज कोसळली'
एका पाकिस्तानी नागरिकाने केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात हा नागरिक म्हणतोय की, सकाळी ड्रोन हल्ला झाला, पण पोलीस म्हणताहेत की, वीज कोसळली आहे.
'इतके नालायक लोक आहेत. सांगत आहेत की आकाशातून वीज कोसळली आहे. यांना काही लाजही वाटत नाहीये इतकं खोटं बोलत आहेत', असा हा व्यक्ती व्हिडीओत बोलताना दिसत आहे.
पाकिस्तान नागरिकाचा व्हिडीओ बघा
On Camera: Pakistani slams own army for downplaying strike on Rawalpindi.
— TIMES NOW (@TimesNow) May 8, 2025
"Itne naalayak log hain… keh rahe hain aasmani bijli giri hai. Sharam nahi aati inhe jhooth bolte hue…"#India#Pakistan#Rawalpindi#OperationSindoor#Trending#Viral#ViralVideopic.twitter.com/27E8LW973M
ज्या ठिकाणी झाला ड्रोन हल्ला, तो व्हिडीओ बघा
An Indian drone has hit Rawalpindi Cricket Stadium. The stadium is hosting the PSL tournament, where Peshawar and Karachi will be playing tonight at 8:00 PM. pic.twitter.com/MNwoh1kwbl
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) May 8, 2025
पाकिस्तान सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू आहे. आज म्हणजे ८ मे रोजी रात्री ८ वाजता रावळपिंडीतील याच मैदानावर सामना होणार आहे. पेशावर जाल्मी आणि कराची किंग्ज या दोन संघात हा सामना होणार आहे.