शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Pakistan Toshakhana Case: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी यांना उच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:22 IST

Imran Khan wife Bushra Bibi Pakistan: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एनएबी कोर्टाने तोशाखाना प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

Pakistan Toshakhana Case, Imran Khan Bushra Bibi Pakistan High Court: इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तोशाखाना प्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला. उच्च न्यायालयानेपाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावण्यात आलेल्या १४ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी ईदच्या सुटीनंतर होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानच्या NAB न्यायालयाने या दोघांना ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर दोघांनाही लग्नासंबंधित खटल्यात स्वतंत्रपणे सात-सात वर्षांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

विशेष न्यायालयाने सुनावली होती शिक्षा

याआधी, गोपनीयतेच्या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने इम्रान आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनाही देशाची काही गोपनीय कागदपत्रे आणि माहितीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर, डिसेंबरमध्ये, नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) ने सौदी क्राउन प्रिन्सकडून मिळालेल्या दागिन्यांचा सेट बाबत नवीन केस दाखल करून घेतली होती.

इम्रान खान आणि बुशरा बीबीला मिळाली होती १०८ गिफ्ट!

इस्लामाबादच्या NAB ने इम्रान आणि त्याच्या पत्नीला दोषी ठरवले होते. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला विविध राष्ट्रप्रमुख आणि परदेशी मान्यवरांकडून १०८ भेटवस्तू मिळाल्याचा आरोप आहे. या निर्णयानुसार, इम्रान खान आणि त्यांची पत्नी १० वर्षे कोणतेही सार्वजनिक पद भूषवू शकणार नाहीत आणि दोघांनाही ७८७ दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमेर फारूक म्हणाले की, शिक्षेविरोधातील अपीलवरील सुनावणी ईदच्या सुटीनंतर होणार आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानCrime Newsगुन्हेगारीHigh Courtउच्च न्यायालय