"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 22:03 IST2025-09-17T22:00:06+5:302025-09-17T22:03:29+5:30

गेल्या 20-25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. कसूरी वेळोवेळी भारताविरोधात वक्तव्ये करत असतो आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. महत्वाचे म्हणजे, त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आधुनिक शस्त्रांनी सज्ज दहशतवादी तैनात असतात.

Pakistan The time will come, the entire Kashmir including rivers and dams will be ours Pahalgam terrorist attack mastermind Saifullah Kasuri threatens India | "वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जम्मू-काश्मीरातील पहलगाम येथे, याच वर्षात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्यादहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली. यानंतर मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत यशस्वी कारवाई करत, पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईनंतर पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आला. आता लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे.

काय म्हणाला सैफुल्लाह? -
सैफुल्लाह कसूरी म्हणाला, 'भारत सरकारने कान उघडून ऐकावे आणि आपल्या क्रूर समाजालाही सांगावे की, ती वेळ येणार आहे, जेव्हा या नद्या, ही धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर आमचा असेल. आज जे काही घडत आहे, त्याचा बदला घेतला जाईल. आम्ही आमच्या जीवावर खेळू आणि आमच्या देशाच्या प्रत्येक भागाचे रक्षण करू. आम्ही आपल्या वतन-ए-अजीजच्या इंचा-इंचाचे संरक्षण करू.'
 
कसूरीच्या धमकीनंतर यंत्रणा सतर्क -
कसूरीच्या धमक्यांनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्व संभाव्य पावले उचलली जात आहेत. याचबरोबर, भारत दहशतवादाविरोधात आणखी कठोर कारवाई करत आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना रोखल्या जाऊ शकतील.

कोण आहे सैफुल्लाह कसूरी? -
सैफुल्लाह कसूरी हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी असून लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख आहे. कसूरी हा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहकारी असल्याचे मानले जाते. गेल्या 20-25 वर्षांपासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. कसूरी वेळोवेळी भारताविरोधात वक्तव्ये करत असतो आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतो. महत्वाचे म्हणजे, त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमीच आधुनिक शस्त्रांनी सज्ज दहशतवादी तैनात असतात.
 

Web Title: Pakistan The time will come, the entire Kashmir including rivers and dams will be ours Pahalgam terrorist attack mastermind Saifullah Kasuri threatens India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.