शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:44 IST

२३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

पाकिस्तान हा भारताचा  शेजारी देश असला, तरी दोन्ही देशांतील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर आखून दहशतवाद्यांची तळे नष्ट केली. या दरम्यान भारताने सिंधु जल करार देखील स्थगित केला. यामुळे पाकिस्तानचे पाणी बंद झाले. यानंतर पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र,आता असे करणे पाकिस्तानलाच खूप महागात पडले आहे. 

भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने पाकिस्तानला दोन महिन्यांत १२०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. २३ एप्रिल रोजी भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेच दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत सांगण्यात आले की हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे दररोज १०० हून अधिक उड्डाणांवर परिणाम होत आहे. यामुळे २४ एप्रिल ते ३० जून दरम्यान पाकिस्तानला ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे (सुमारे १२४० कोटी भारतीय रुपये) नुकसान झाले आहे.

पाकिस्तानचे आधीच मोठे नुकसान पाकिस्तानने अनेक वेळा आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्येही पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्या काळात पाकिस्तानला ५४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर खूप तणाव होता. याच कारणामुळे पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले.

भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र सध्या बंद!भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर संबंधांमध्ये बरीच कटुता निर्माण झाली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि सिंधू पाणी कराराद्वारे भारताने पाकिस्तानला कठोर धडा शिकवला आहे. यामुळेच पाकिस्तान संतापला आहे. संघर्ष संपल्यानंतरही काही महिने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला