शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

भारतासमोर पाकिस्तान झुकला, चर्चेसाठी गुपचूप प्रस्ताव पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 8:29 PM

पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे.

इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अर्थव्यवस्थेचा कोसळता डोलारा सावरण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने चर्चेसाठी गुपचूप संपर्क साधला आहे. मात्र भारताकडून पाकिस्तानला फार उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही. एक पाश्चिमात्य मुत्सद्दी आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पाकिस्तानी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याकडून अत्यंत गुपचूप पद्धतीने हा संपर्क साधण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा 2015 पासून बंद असून, ती नव्याने सुरू करण्यासाठी हा संपर्क साधण्यात आला होता. दोन्ही देशांमधील व्यापारामधील अडथळे दूर करण्यासाठी पाकिस्तान  भारतासोबत चर्चेसाठी प्रयत्नशील आहे.  दोन्ही देशांमधील व्यापार मुक्तपणे सुरू झाल्यास पाकिस्तानला भारतातील स्थानिक बाजारांमध्ये आपला माल पाटवणे शक्य होणार आहे. तसेच काश्मीरबाबत शांततेसाठी होणारी चर्चा द्विपक्षीय व्यापारालाही उत्तेजन देईल कारण परस्पर विश्वास निर्माण होण्यसाठी काश्मीर प्रश्नावरील चर्चा महत्त्वाची मानण्यात येते. देशाची ढासळती अर्थव्यवस्था लष्करी शक्तीसाठी धोका ठरू शकते, त्यामुळे विद्रोही शक्तींना डोके वर काढण्यासाठी बळ मिळू शकते, जे मोठे आव्हान ठरू शकते, ही बाब पाकिस्तानी लष्कराला जाणवली आहे. त्यामुळेच त्यांनी चार पावले मागे येत भारतासोबत चर्चा करण्यासाठी तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी 9 अब्ज डॉलरची मदत मागणार आहे. पाकिस्तानवर चिनचे अनेक अब्ज डॉलरचे कर्ज असून, या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाक प्रयत्नशील आहे.दरम्यान, भारतासोबतच्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, "त्यांचा देश आपल्या सर्व शेजारी देशांची चांगले संबंध निर्माण करू इच्छितो. पाकिस्तानला कमकुवत करून भारताचीही भरभराट होणार नाही, असे जनरल बाजवा यांचे म्हणणे आहे. त्यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा संबंध संरक्षणाशी जोडला होता." 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPoliticsराजकारण