शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:42 IST

Pakistan Saudi Defense Pact, Iran War: इराण आणि सौदी अरब यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदीला लष्करी पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर.

पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने काही महिन्यांपूर्वी एकमेकांना युद्धात मदत करण्याचा करार केला होता. यामुळे सौदीच्या संरक्षणासाठी पाकिस्तानचे अणुबॉम्ब तयार असतील, अशा आशयाची वक्तव्ये पाकिस्तानी नेत्यांनी केली होती. तसेच सौदी देखील पाकिस्तानच्या मदतीला धावेल, असे पाकिस्तानने म्हणत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानची फुशारकी आता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

मध्य पूर्वेतील आखाती देशांवर इराण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. या देशांकडे पुरेसे सैन्यबळ नाही तसेच हे हल्ले परतवून लावण्याची यंत्रणाही नाही. इराणने सौदीला देखील नामोहरम करून सोडले आहे. यामुळे आता या करारानुसार पाकिस्तानने आपली मदत करावी, सैन्य आणि लष्करी यंत्रणा पाठवावी अशी मागणी सौदी करू लागला आहे. इराणकडून सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकन तळांवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी रियाधमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली.

सौदीचा पाकिस्तानवर दबाव?सौदी अरब इराणविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानने सामील व्हावे यासाठी दबाव टाकत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोन्ही देशांमध्ये 'स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट' झाले होते. या करारानुसार, सौदीवर झालेला हल्ला हा पाकिस्तानवर झालेला हल्ला मानला जाईल. या करारानुसार पाकिस्तानने आता आपली लष्करी ताकद सौदीसाठी वापरावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

पाकिस्तानची कोंडी: इराणचा इशारादुसरीकडे, पाकिस्तान या युद्धात पडण्यास कचरत आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी पाकिस्तानला या युद्धापासून लांब राहण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल इराणच्या हक्कांना मान्यता देत नाहीत, तोपर्यंत हे युद्ध थांबणार नाही. पाकिस्तान सध्या इराण आणि सौदी अरब यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र सौदीच्या लष्करी दबावामुळे पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan in a Bind: Saudi Pressure to Confront Iran?

Web Summary : Pakistan faces pressure from Saudi Arabia to provide military assistance against Iran, based on a prior defense agreement. Iran warns Pakistan to stay out of the conflict, creating a difficult situation for the country.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्ध