Pakistan Imran Khan : इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी लपल्याचं वृत्त, पोलिसांचा परिसराला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:14 IST2023-05-17T16:11:34+5:302023-05-17T16:14:07+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Pakistan Imran Khan : इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी लपल्याचं वृत्त, पोलिसांचा परिसराला घेराव
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. इम्रान खान यांच्या जमान पार्क स्थित येथील निवासस्थानी ३० ते ४० दहशतवादी लपल्याची माहिती पाकिस्तानातील पंजाब सरकारचं म्हणणं आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना सोपवण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.
पंजाबच्या अंतरिम सरकारनं माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील जमान पार्क निवासस्थानी लपलेल्या ३० ते ४० दहशतवाद्यांना पोलिसांकडे सोपवण्यासाठी २४ तासांची मुदत दिली आहे. पाकिस्तानातील मंत्री अमिर मीर यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यानं यासंदर्भातील माहिती दिली.
पीटीआयनं या दहशतवाद्यांना पोलिसांच्या स्वाधिन करावं, अन्यथा कायदा आपलं काम करेल. दहशतवाद्यांबद्दल आपल्याला कल्पना होती कारण आपल्याकडे त्यांसंदर्भातल गुप्त रिपोर्ट होता, असं मीर म्हणाले. जो रिपोर्ट आम्हाला मिळालाय तो अतिधय धोकादायक आहे. एजन्सी जियो फेन्सिंगद्वारे जमान पार्कात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत पुष्टी करण्यात सक्षम आहेत. पीटीआय प्रमुख वर्षभरापासून लष्कराला निशाणा बनवत असल्याचंही मीर म्हणाले.
सोमवारी झाली सुनावणी
खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणीसाठी हजर झाले. त्याआधी इम्रान खान यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी अटकेत असताना उसळलेल्या हिंसाचाराचे निमित्त करून एक कट शिजविण्यात आला. माझी पत्नी बुशरा बेगम हिला तुरुंगात टाकण्याचा तसेच देशद्रोहाच्या आरोपाखाली मला पुढील दहा वर्षे कारावासाची शिक्षा देण्याचे लष्कराने ठरविले आहे.